Soybean Farming : राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नसले तरी देखील पूर्व मौसमी पावसाच्या सऱ्या बरसत आहेत. आज जळगाव, नासिक जिल्ह्यातील अनेक भागात वादळी पावसाची हजेरी लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा या परिसरात पूर्व मौसमी पावसाने वातावरण अल्हाददायक बनवले आहे.
मात्र, या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. जळगावमध्ये यामुळे केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. मात्र पावसाला सुरुवात झाली असल्याने मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडसं समाधान पाहायला मिळत आहे. शिवाय सामान्य जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आगामी काही दिवसात राज्यात मान्सूनचे आगमन होईल आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकरी बांधव पीक पेरणीला सुरुवात करणार आहेत. यंदा शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी करतील असे आशावादी चित्र देखील तयार होत आहे.
मात्र सोयाबीनची पेरणी करताना सोयाबीन उत्पादकांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. जर तुम्हीही सोयाबीनची शेती करणार असाल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा.
आज आपण शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून त्यांना अधिकचे उत्पादन मिळवता येईल यासंदर्भात तज्ञ लोकांनी दिलेली माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोयाबीनची पेरणी करतांना या गोष्टींची काळजी घ्या
सोयाबीनची पेरणी पारंपारिक पद्धतीने करण्याऐवजी टोकन पद्धतीने करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करण्याआधी जमिनीत खत मिसळून घ्यावे. यानंतर मग 3/5 अंतरावर बेड तयार करावेत. यानंतर मग टोकन यंत्रांच्या माध्यमातून या बेडच्या दोन्ही बाजूने सोयाबीनची लागवड करावी.
टोकन यंत्राच्या माध्यमातून टोकन करून लागवड करताना एका ठिकाणी दोन दाणे पडतील अशी सेटिंग करून घ्यावी.
लागवड करण्यापूर्वी मात्र बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. तसेच सोयाबीनचे बियाणे दर्जेदार असावे. नाहीतर अनेकदा असे आढळून आले आहे की सोयाबीन लागवड केल्यानंतर बियाणे अंकुरत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते जे की शेतकऱ्यांसाठी खर्चिक सिद्ध होते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जातो तसेच पिक उत्पादन देखील दुबार पेरणी केल्यानंतर कमी होते.
हे पण वाचा :- अखेर शासनाला जाग आली ! ‘या’ शेतकऱ्यांना 46 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर, वाचा…
तसेच सोयाबीनच्या सुधारित वाणाचीच शेतकऱ्यांनी पेरणी केली पाहिजे. जर तुम्ही टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड करत असाल तर आपण फुले संगम या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाची निवड करू शकता. या वाणाची टोकन पद्धतीने शेती करून अनेकांनी विक्रमी उत्पादन मिळवले आहे. अनेक जाणकार लोकांनी या जातीची लागवड करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.
या पद्धतीने सोयाबीन लागवड केल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा राहील याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यायची आहे.
जर लागवड केल्यानंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसेल तर तुषार सिंचन पद्धतीने पिकाला सिंचन करायचे आहे. कारण की, या पद्धतीने सोयाबीन लागवड केल्यास सोयाबीन बियाणे अधिक खोलवर न रुजता थोडे वर राहते. यामुळे अशा पद्धतीने जर लागवड केली असेल तर जमिनीत लागवडीनंतर ओलावा असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :- दिलासादायक ! राज्यातील ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार 16 कोटी 48 लाख रुपयाचा निधी; कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची माहिती