अखेर शासनाला जाग आली ! ‘या’ शेतकऱ्यांना 46 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठा फटका बसत आहे. कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी ढगाळ हवामान यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या पिक उत्पादनात घट होत आहे.

नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या उदासीन धोरणाचा देखील मोठा फटका बसतो. यामध्ये अनेकदा शासनाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतो.

सन 2021 आणि 2022 मध्ये महाराष्ट्रात अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये अकोला जिल्ह्याचा देखील समावेश होता. ऑक्टोबर 2021, डिसेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा आणि अतिवृष्टीचा मोठा तडाका बसला.

या अवकाळी पावसाचा आणि अतिवृष्टीचा खरीप हंगामातील, रब्बी हंगामातील तसेच फळबाग पिकांना फटका बसला होता. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. परिणामी या संबंधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते. यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करण्यात आला होता. 

हे पण वाचा :- दिलासादायक ! राज्यातील ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार 16 कोटी 48 लाख रुपयाचा निधी; कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची माहिती

प्रशासनाने या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे केले आणि निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अकोला जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाला हा नुकसान भरपाई साठी आवश्यक निधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला होता.

मात्र कोविडच्या प्रादुर्भावामुळे तसेच अन्य कारणांमुळे निधी मागणीच्या प्रस्तावांवर कार्यवाही होऊ शकली नाही. हा प्रस्ताव शासनाकडे धुळखात पडला होता. दरम्यानच्या काळात विभागीय आयुक्तांकडून पुन्हा याचा प्रस्ताव मागवून घेण्यात आले.

आणि आता 2021 आणि 2022 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाची आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई जून 2023 मध्ये संबंधित शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली आहे. 5 जून 2023 रोजी शासनाकडून या संबंधित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

यानुसार, आता अकोला जिल्ह्यातील डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या पावसामुळे 17 हजार 173.95 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 15 कोटी 4 लाख 97 हजार रुपयाची नुकसान भरपाई जाहीर झाली आहे. 

हे पण वाचा :- डेरिंग केली पण वाया नाही गेली ! नोकरी सोडली, सुरू केल पशुपालन, दूध नाही तर तुपाच्या व्यवसायातून कमवतोय लाखो, वाचा….

तसेच ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या पावसामुळे 29,161.68 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तीस कोटी 77 लाख 92 हजार रुपयाची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

तसेच मे 2022 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 63.52 हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 11 लाख 43 हजार रुपयाची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

म्हणजेच अकोला जिल्ह्यातील 2021 आणि 2022 मध्ये अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 45 कोटी 94 लाख 32 हजार रुपयाची नुकसान भरपाई पाच जून 2023 रोजी जाहीर झाली आहे.

यामुळे उशिरा का होईना पण अकोला जिल्ह्यातील या संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारी काम आणि सहा महिने थांब याची प्रचिती आली आहे.

मात्र उशिरा का होईना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली असल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले जात आहे. 

हे पण वाचा :- उन्हाळी कांदा शेतकऱ्यांना बनवणार मालामाल; दरात झाली सुधारणा, ‘या’ बाजारात मिळाला विक्रमी भाव, आणखी भाव वाढणार? वाचा….

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा