Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राच्या विकासात गेम चेंजर सिद्ध होणारा समृद्धी महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. सध्या या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी जो की, 520 किलोमीटर लांबीचा आहे तो प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण दस्तुरखुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे डिसेंबर 2022 मध्ये झाली आहे.
या महामार्गाचा उर्वरित टप्पा अर्थातच शिर्डी ते मुंबई हा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. अशातच आता या महामार्गातील दुसऱ्या टप्प्या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी ते मुंबई या दुसऱ्या टप्प्यातील शिर्डी ते भरवीर या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा शिर्डी ते भरविरचा टप्पा 80 किलोमीटर लांबीचा असून याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
हे पण वाचा :- सातवी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी निघाली जाहिरात, पगार मिळणार तब्बल 60 हजार, आजच करा अर्ज
काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये हा टप्पा मार्च अखेर प्रवाशांसाठी खुला केला जाईल असा दावा केला जात होता. मात्र अद्याप हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत कोणतीच अधिकारीक माहिती समोर आलेली नाही. आता मार्च एंडिंग ला मात्र पाच दिवसाचा कालावधी उरला आहे. या परिस्थितीत या टप्प्याबाबत आता संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. मार्च अखेर हा टप्पा सुरू होईल का? याबाबत आता शँका उपस्थित होत आहे.
परंतु जर हा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला तर निश्चितच नागपूर ते नाशिक दरम्यान चा प्रवास सोयीचा होणार आहे. एवढेच नाही तर मुंबई वासियांना शिर्डी जातानाही यामुळे मोठी मदत मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य रस्ते विकास महामंडळ लवकरच हा टप्पा प्रवासासाठी खुला करणार आहे. यामुळे हा टप्पा वाहतूक सेवेत आल्यानंतर नागपूर ते नाशिक हे अंतर मात्र पाच ते साडेपाच तासात पार करता येणे शक्य होणार आहे.
हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ लोकांचे रेशन कार्ड झाले बंद; तहसीलला रेशन कार्ड जमा करण्याचे आवाहन; यादीत तुम्हीही आहात का?
जसं की आपणास ठाऊकच आहे समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर आहे. यापैकी 520 किलोमीटरचा टप्पा अर्थातच नागपुर ते शिर्डी गेल्यावर्षी डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पहिल्या नागपूर ते शिर्डी टप्प्यामुळे नागपूर सहित संपूर्ण विदर्भवासियांना शिर्डी जवळ झाली आहे. यामुळे साई भक्तांना साईनगर शिर्डी गाठण्यास कमी कालावधी लागत आहे.
प्रवाशांचा वेळ वाचत असून या मार्गाला प्रवाशांनी मोठी पसंती देखील दर्शवली आहे. त्यामुळे या मार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी ते मुंबई लवकरच पूर्ण व्हावा अशी प्रवाशांची इच्छा आहे. दरम्यान या दुसऱ्या टप्प्यामधील शिर्डी ते भरविर हे 80 किलोमीटरचे अंतर बांधून तयार झाले आहे. विशेष म्हणजे शिर्डी ते भरवीर हा मार्ग या महिन्याखेर सुरू करण्याचे नियोजन राज्य रस्ते विकास महामंडळाच आहे.
याबाबत मात्र अद्याप अधिकारीक माहिती हाती आलेली नाही. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी या संदर्भात एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टला माहिती दिली होती.
हे पण वाचा :- 10वी पास महिलांना मुंबईमध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू, वाचा डिटेल्स
गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार हा शिर्डी ते भरवीर दरम्यानचा टप्पा मार्च अखेर खुला होणार आहे. निश्चितच जर मार्च अखेर हा टप्पा खुला झाला तर येत्या पाच ते सहा दिवसात प्रवाशांना नागपूर ते नाशिकचा प्रवास सोयीचा होणार आहे. त्यामुळे मुंबई वासियांना देखील शिर्डी जाताना कमी वेळ खर्च करावा लागणार आहे. दरम्यान शिर्डी ते भरवीर हा टप्पा सुरू झाल्यानंतर भरवीर ते इगतपुरी हा टप्पा जून पर्यंत पूर्ण करण्याच टार्गेट राज्य रस्ते विकास महामंडळाने ठेवल आहे.
निश्चितच समृद्धी महामार्गाचे काम जलद गतीने होत असून हा संपूर्ण महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन राज्य रस्ते विकास महामंडळाचे आहे. विशेष बाब अशी की, आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून देखील हा मार्ग जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सूचना राज्यव्यवस्थे विकास महामंडळाला दिल्या जात आहेत.
यामुळे हा हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत येईल आणि यामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- नवयुवक तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ महानगरपालिकेत निघाली मोठी भरती; पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स, पहा डिटेल्स