Mumbai Mahanagarpalika Bharati 2023 : दहावी पास महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या महिलांना मुंबईमध्ये नोकरीची इच्छा असेल अशा महिलांसाठी ही तर आनंदाची पर्वनीच राहणार आहे. कारण की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल साडेपाच हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या भरतीच्या माध्यमातून आशा सेविकांची 5575 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांची भरती मात्र कंत्राटी तत्त्वावर केली जाणार आहे. यासाठी महानगरपालिकेने नुकतीच अधिसूचना काढली असून यासाठीची अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत इच्छुक आणि पात्र महिलांना यासाठी अधिकाअधिक अर्ज करण्याचे आव्हान देखील केले जात आहे.
हे पण वाचा :- नवयुवक तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ महानगरपालिकेत निघाली मोठी भरती; पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स, पहा डिटेल्स
जसं की आपणास ठाऊकच आहे कि, मुंबईकरांना घराजवळ व सहजपणे आरोग्य सेवा मिळावी म्हणून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रम राजधानी मध्ये नुकताच सुरू करण्यात आला आहे. दरम्यान आता वस्ती पातळीवर गृहभेटी देऊन आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न जोरात सुरू आहेत.
दरम्यान महापालिकेने हाती घेतलेल्या या उपक्रमासाठी ही आशा सेविकांची भरती करण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. दरम्यान आज आपण आशा सेविका या पदासाठी काढण्यात आलेल्या या अधिसूचनेविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- अखेर ठरलं! ‘या’ दोन शहरादरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन 14 एप्रिलला होणार सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन
किती पदांसाठी निघाली आहे भरती?
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 5575 नवीन आशा सेविकांची पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या पदासाठी दहावी पास महिला पात्र राहणार आहेत. 25 ते 45 वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र राहतील. संबंधित महिलांकडे नेतृत्व गुण आणि समुदायाशी चर्चा करण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. महिलांचे निवासस्थान हे संबंधित विभागाच्या जवळ असणे आवश्यक राहणार आहे.
किती मिळणार मानधन?
दरमहा सहा हजार रुपये मानधन या पदासाठी दिले जाणार आहे. कामावर आधारित मानधन राहणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत?
अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्जाचा नमुना विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) यांचेकडे मिळणार आहे. अर्ज प्राप्त केल्यानंतर इच्छुक आणि पात्र महिलांनी अर्ज काळजीपूर्वक भरून पालिकेच्या ए ते टी विभाग कार्यालयांमध्ये सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक
या पदासाठी इच्छुक आणि पात्र महिलांना 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
हे पण वाचा :- केंद्र सरकारची मोठी घोषणा; आता सर्वसामान्यांना एलपीजी सिलेंडर मिळणार मात्र ‘इतक्या’ रुपयात, सबसिडी वाढवली, पहा….