Maharashtra Government Job Alert : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. ज्या तरुणांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल अशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण की मुंबई महानगरपालिकेमध्ये आहार तज्ञ या पदासाठी पदभरती आयोजित करण्यात आली आहे.
विशेष बाब अशी की मुंबई महानगरपालिका ने यासंदर्भात नुकतीच अधिसूचना काढली आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. अशातच आज आपण या भरती संदर्भात काही आवश्यक माहिती तपशीलवार जाणून घेण्याचा प्रयत्न आज करणार आहोत.
हे पण वाचा :- अखेर ठरलं! ‘या’ दोन शहरादरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन 14 एप्रिलला होणार सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन
किती जागांसाठी आहे भरती?
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या आहार तज्ञ या रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज कसा करावा लागणार?
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
हे पण वाचा :- केंद्र सरकारची मोठी घोषणा; आता सर्वसामान्यांना एलपीजी सिलेंडर मिळणार मात्र ‘इतक्या’ रुपयात, सबसिडी वाढवली, पहा….
शैक्षणिक पात्रता नेमकी काय?
आहार तज्ञ या पदासाठी संबंधित विषयातील पदवी ग्रहण केलेला उमेदवार या पदासाठी पात्र राहणार आहेत. जाहिराती मध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर पात्रता देखील उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
या पदासाठी चार एप्रिल 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
पगार किती मिळणार
अधिसूचनेत नमूद केलेल्या माहितीनुसार, या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 1200 रुपये प्रति दिवस इतक वेतन राहणार आहे.
या भरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना एकदा भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे मात्र गरजेचे राहणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कापूस बियाणे इतक्या रुपयांनी वाढले, लागवडीचा खर्च वाढणार