Pune News : महाराष्ट्राला नुकतीच दोन वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-साईनगर शिर्डी या रूट दरम्यान धावणाऱ्या दोन वंदे भारत एक्सप्रेसला नुकताच हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. यापैकी मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन ही पुणे मार्गे धावणारी आहे.
त्यामुळे या ट्रेनचा पुणेकरांना देखील मोठा फायदा होत आहे. पुणेकरांना मुंबई तसेच सोलापूरच्या दिशेने प्रवास करणे यामुळे सुलभ झाले आहे. दरम्यान आता पुणेकरांना आणि सोलापूर वासियांना लवकरच एक मोठी भेट दक्षिण रेल्वेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. मध्य रेल्वेने ज्या पद्धतीने मुंबई सोलापूर ट्रेन सुरू करून सोलापूर आणि पुणेवासियांना भेट दिली आहे.
हे पण वाचा :- Solapur News : सोलापूर अन पुणेकरांना लवकरच मिळणार आणखी एक वंदे भारतची भेट ! असा राहील रूट, वाचा डिटेल्स
तशीच आता सिकंदराबाद पुणे या रोडवर वंदे भारत ट्रेन सुरू करून आता पुणे आणि सोलापूर वासियांना दक्षिण रेल्वेच्या माध्यमातून भेट दिली जाणार आहे. एका रेल्वे अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, सध्या स्थितीला सिकंदराबाद-पुणे या रूट वर सुरू असणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या रेक एप्रिल महिन्यात बदलल्या जाणार आहेत. म्हणजेच आता दक्षिण मध्ये रेल्वे विभागाच्या माध्यमातून सिकंदराबाद पुणे अशी वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे.
हे जवळपास ठरलेलच आहे. आता रेक बदलून या कामाला गती देण्याचं काम सुरू आहे. ही रेल्वे दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत सुरू होईल आणि सिकंदराबाद रेल्वे विभागात येईल. या रेल्वेमुळे पुणे आणि सोलापूर वासियांना हैदराबाद कडील प्रवास सोयीचा होईल. शिवाय या ट्रेनमुळे सोलापूर वासियांना पुणे कडे जाणे देखील सोयीचे होणार आहे.
या पुणे सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन बाबत अधिक माहिती देताना एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, हे जवळपास अंतिम झाले असून नवीन ट्रेन लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही ट्रेन दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या सिकंदराबाद रेल्वे विभागातील असेल. शताब्दी एक्स्प्रेस गाड्या वंदे भारत रेकने बदलण्याचा निर्णय रेल्वेने आधीच घेतला आहे आणि हे पाऊल त्याच्याशी सुसंगत आहे.
म्हणजेच रेक बदलल्यानंतर लवकरच या वंदे भारत ट्रेन बाबत देखील घोषणा होणार आहे. तूर्तास मात्र पुणे सिकंदराबाद वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाबाबत औपचारिक माहिती समोर आलेली नाही. पण या रूटवरील रेक बदलल्यानंतर लवकरच या पुणे-सिकंदराबाद वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनांची तारीख दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून समोर येईल असं सांगितलं जात आहे.