Vande Bharat Express : महाराष्ट्रातील मध्य रेल्वे विभागाच्या ताफ्यात नव्यानेच सामील झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. पण मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचीं तुलना केली तर मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ला प्रवाशांचीं अधिक पसंती लाभत आहे.
एकाच दिवशी सुरू झालेल्या या दोन वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहुन सोलापूर आणि शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन आल्या आहेत. मात्र मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ला प्रवाशांची अपेक्षित अशी पसंती मिळत नसल्याने आता या वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
खरं पाहता तज्ञ लोकांनी मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा अधिक पसंती मिळणार असा दावा केला होता. सद्यस्थितीला मात्र मुंबई पुणेमार्गे सोलापूर वंदे भारत ट्रेनला अधिक रिस्पॉन्स मिळत आहे.
यामुळे आता मध्य रेल्वेने मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस या गाडीमध्ये प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन प्रवाशांना काही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साई दर्शनासाठी व्हीआयपी पास आणि प्रसादाचे लाडू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष बाब म्हणजे यासाठी मध्य रेल्वेच्या माध्यमातून जोमात प्रयत्न सुरू असून एका मीडिया रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार लवकरच मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून श्री साईबाबा संस्थानशी याबाबत सविस्तर अशी चर्चा होणार आहे आणि लवकरच तसा प्रस्ताव देखील तयार होणार आहे. खरं पाहता या ट्रेनला प्रवाशांची पसंती मिळत आहे मात्र जशी अपेक्षा मध्य रेल्वेला होती त्या अपेक्षेच्या तुलनेत कुठे ना कुठे प्रतिसाद कमी आहे.
या गाड्यांचे आरक्षण फुल होत नसल्याने प्रवासी संख्या वाढवण्यासाठी मध्य रेल्वे कडून नवनवीन उपाय योजना आखल्या जात आहेत. याच उपाय योजनेचा एक भाग म्हणून आणि मुंबई शिर्डी वंदे भारत ट्रेन ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साईबाबांचे दर्शन सुलभतेने व्हावे या अनुषंगाने साई दर्शनाचा व्हीआयपी पास आणि श्री साईबाबा संस्थान च्या माध्यमातून मिळणारा प्रसाद, लाडू प्रवाशांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय होणार आहे.
हे पण वाचा :- Vande Bharat Train : पुणेकरांसाठी गोड बातमी! लवकरच मिळणार अजून एक वंदे भारत एक्सप्रेसचीं भेट; ‘या’ रूटवर धावणार