Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने राज्य शासन कायमच प्रयत्न करत असते. शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचवण्यासाठी, त्यांच्या उत्पादनात भरीव वाढ व्हावी म्हणून शासनाकडून विविध उपाय योजना केल्या जातात. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवले जाते. यासाठी विविध योजना शासन सुरू करते.
केंद्र शासनाने याच पार्श्वभूमीवर पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो. हे सहा हजार रुपये मात्र शेतकऱ्यांना एक रक्कमीं मिळत नाहीत. दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले जातात.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 13 हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. 14 वा हप्ता देखील लवकरच पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे ही योजना शेतकऱ्यांमध्ये खास लोकप्रिय आहे. या योजनेची लोकप्रियता आणि फायदा पाहता राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने देखील या योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी योजनेची सुरुवात केली आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, यंदाच्या खरीप हंगामात ‘या’ पिकांची लागवड करू नका ! कृषी विभागाचा महत्वाचा सल्ला
या योजनेचे स्वरूप पात्रता आणि निकष सर्व पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे. पीएम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र राहतील तेच शेतकरी नमो शेतकरीसाठी पात्र राहणार आहेत. दरम्यान नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्याचे नियोजन आहे. पीएम मोदी यांच्या उपस्थितीत या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
कृषी विभागाने पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारकडे पाठविली असून त्यासाठी एक हजार ४४५ कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र पंतप्रधानांची वेळ अजून निश्चित झाली नसल्याने पहिला हप्ता लांबणीवर पडला असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदिंमुळे नमो शेतकरी चा पहिला हप्ता लांबणीवर पडला आहे.
दरम्यान, या योजनेचा पहिला हप्ता हा जून महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील 72 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसानच्या ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण, एकत्रित मालमत्ता नोंद अशी प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा हप्ता दिला जाणार आहे.
हे पण वाचा :- कापसाचा हंगाम होणार गोड ! वायद्यात कापूस दरात झाली मोठी वाढ, बाजारात किती मिळतोय भाव? आगामी काळात भाव वाढतील?
तसेच ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्यांना आता शेवटची संधी दिली जाणार आहे. जे शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांच्या नावांची यादी गावोगावी वाचली जाईल. पंचनामा करून त्या शेतकऱ्यांची नावे यादीतून कायमची डिलीट केली जाणार असल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे केंद्र व राज्याच्या योजनांसाठी पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण व मालमत्तांची एकत्रित नोंद केलेली नाही, त्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
जून अखेरीस मिळणार गुड न्युज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नमो शेतकरी योजनेच्या लोकार्पणासाठी वेळ मागितला गेला आहे. पुढील आठवड्यात ते वेळ देतील असं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. म्हणून पुढील आठवड्यात या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.