‘या’ कापूस वाणाला खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची उडतेय झुंबड ! MRP पेक्षा अधिक किंमत देऊन शेतकरी करताय खरेदी; नेमकं या वाणात आहे तरी काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Variety : कापूस महाराष्ट्रात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक. याला व्हाईट गोल्ड म्हणजे पांढरं सोन म्हणतात. या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड केली जाते. कापूस लागवडीच्या बाबतीत आपले महाराष्ट्र राज्य देशात शीर्ष स्थानावर विराजमान आहे. मात्र कापसाची उत्पादकता आपल्या राज्यात खूपच कमी आहे.

इतर प्रमुख कापूस उत्पादक राज्य गुजरात, राजस्थान, बिहार इत्यादी राज्यांमध्ये कापसाचा प्रतिक्विंटल उतारा खूपच अधिक आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांना कापसाचे पीक फायदेशीर ठरत आहे. मात्र आपले महाराष्ट्रातील कापूस उत्पादक आर्थिक संकटात सापडू लागले आहेत. कापूस लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे यामुळे उत्पादन अधिक भासते परंतु कापसाची प्रति एकर उत्पादकता खूपच कमी असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे कापूस उत्पादकांना नेहमीच सुधारित कापूस वाणाची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो. दरम्यान आपल्या राज्यातील कॉटन बेल्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या विदर्भात तसेच मराठवाडा आणि खानदेशात देखील कापसाच्या दोन वाणाची मागणी गेल्या दोन वर्षांपासून विक्रमी वाढली आहे. कबड्डी आणि पंगा असे या दोन वाणाचे नाव आहे. या वाणाचे कापूस बियाणे शेतकरी अधिकचा पैसा देऊन खरेदी करत आहेत.

या वाणाची लोकप्रियता पाहता विक्रेत्यांकडून काळाबाजारी केली जात असून 800 रुपयांचे पॅकेट 1500 रुपयांपर्यंत विक्री होत आहे. विशेष म्हणजे एवढ्या अधिक दरातही शेतकरी मोठ्या प्रमाणात याच कापसाच्या बियाण्याची खरेदी करत आहेत. यामुळे नेमके या वाणात काय दडले आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत शिवाय इतरही कापसाच्या प्रमुख जाती आज आपण जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- आज राज्यात उष्णतेची लाट येणार ! पण ‘त्या’ 7 जिल्ह्यात होणार वादळी पाऊस, हवामान विभागाची माहिती  

कापसाच्या प्रमुख जाती

US 7067 :- कापसाचा हा एक प्रमुख वाण असून महाराष्ट्रात याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या वाणाची विशेषता म्हणजे जिरायती आणि बागायती परिस्थितीमध्ये याची लागवड होते. मध्यम ते भारी जमिनीत याची लागवड शक्य आहे. सरासरी 160 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते आणि एकरी 11 ते 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. या जातीची चार बाय तीन किंवा चार बाय एक या अंतरावर लागवड केल्यास अधिकचे उत्पादन मिळते.

वेदा बसंत गोल्ड GK 238 BG II :- या वाणाची राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड होते. प्रमुख कारण असे की हलक्या, मध्यम आणि भारी जमिनीत या जातीची लागवड शक्य आहे. मात्र कपाशी लागवड ही नेहमीच मध्यम किंवा भारी जमिनीत केली पाहिजे जेणेकरून या पिकातून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळते. हलक्या जमिनीत या पिकाची जरी लागवड शक्य असेल तरी देखील उत्पादन निश्चितच कमी होणार आहे. दरम्यान या जातीबाबत बोलायचं झालं तर या जातीचे कापसाचे बोंड हे आकाराने मोठे आणि वजनदार असते. या जातीचा कापूस वेचणीस सोपा असतो. बोंडाचे वजन जवळपास सहा ते सात ग्रॅम असल्याचा दावा केला जातो. या जातीची दाट लागवड केली तरी चालते. साधारणता दहा ते पंधरा क्विंटल प्रति एकर उत्पादनक्षमता या जातीची असल्याचा दावा काही तज्ञांनी केला आहे.

Nuziveedu Seeds आशा BG 2 :- Nuziveedu या कंपनीचे आशा बीजी टू हे वाण राज्यातील हवामानासाठी अनुकूल आहे. या जातीची लागवड मध्यम आणि हलक्या जमिनीत केली जाऊ शकते. या जातीचे कापूस पीक साधारणता 170 ते 180 दिवसात परिपक्व कोणते. या जातीपासून एकरी दहा ते पंधरा क्विंटल चा उतारा शेतकऱ्यांना मिळू शकतो असा दावा केला गेला आहे. या जातीचा कापूस वेचणीसाठी सोपा असतो म्हणून या जातीची लागवड शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

हे पण वाचा :- हळद लागवड करताय? मग हळदीच्या सुधारित जाती आणि त्यांच्या विशेषता एकदा वाचाच !

कापसाच्या पंगा आणि कबड्डी वाणाच्या विशेषता खालील प्रमाणे

हे वाण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतकऱ्यामध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. यंदा तर दुकानदार या जातीच्या कापूस बियाण्याची काळाबाजारी देखील करत आहेत. या जातीच्या कपाशीचे बियाण्याचे पॅकेट हे चढ्या आणि आवाजवी दरात विकले जात आहेत. खरतर या दोन्ही जाती हलक्या, मध्यम आणि भारी जमिनीत उत्पादित केल्या जाऊ शकतात.

एवढेच नाही तर बागायती आणि कोरडवाहू सिंचन परिस्थितीमध्ये देखील या जाती अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहेत. या जातीच्या कापसाचे बोंडाचे वजन साधारणतः पाच ग्रॅम भरते. एकरी 10 ते 15 क्विंटल चा उतारा याही जातीमधून मिळतो. सर्वात मोठी विशेषता म्हणजे या जातीचा कापूस अधिक पाऊस म्हणजेच अतिवृष्टी सारखी परिस्थिती झाली तरीही अधिक उत्पादन देऊ शकतो.

हे पण वाचा :- ‘अस’ झालं तरच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ! कापसाच्या दरात होणार विक्रमी वाढ, वाचा…