Mumbai Coastal Road Inauguration Date : राजधानी मुंबई मधील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे. शहरात वाढणारी लोकसंख्या, वाढणाऱ्या वाहनांची संख्या पाहता ट्रॅफिकची समस्या आगामी काही वर्षात आणखीनच तीव्र स्वरूपाची बनणार आहे. शिवाय यामुळे राजधानी मुंबईतील हवा दूषित बनत असून प्रदूषणाचा स्तर हा मुंबईकरांसमवेतच संपूर्ण महाराष्ट्रासाठी चिंतेचा विषय आहे.
याच पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी, प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच इंधनाची बचत व्हावी म्हणून शासन स्तरावर तसेच प्रशासन स्तरावर वेगवेगळ्या प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक बहुउद्देशीय प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये शहरात सागरी मार्ग तयार केले जात आहेत, उड्डाणपूल तयार केले जात आहेत, भुयारी मार्ग तसेच ऍलिव्हटेड कॉरिडॉर देखील विकसित होत आहेत.
हे पण वाचा :- अखेर निर्णय झालाच! 1 एप्रिलला ‘या’ दोन शहरादरम्यान सूरू होणार 11वी वंदे भारत ट्रेन; पहा संपूर्ण रूटमॅप
दरम्यान आता मुंबई शहरासाठी अति महत्त्वाचा असा बहुउद्देशीय प्रकल्प आणि शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प अर्थातच मुंबई कोस्टल रोड बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. हा प्रकल्प मरीन ड्राईव्ह-वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान प्रवासासाठी फायदेशीर असून यामुळे हे अंतर मात्र आठ मिनिटात पार होणार आहे. या मार्गाची विशेषता अशी की हा एक टोल फ्री मार्ग राहणार आहे.
हा मार्ग चार + चार अशा मार्गिका तयार करून विकसित करण्यात येत आहे. एकंदरीत हा दक्षिण मुंबईमधील एक महत्त्वाचा प्रकल्प असून आता या प्रकल्पाच्या उद्घाटनाची चर्चा रंगत आहे. खरं पाहता मुंबई कोस्टल रोडचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून नोव्हेंबर महिन्यात हा प्रकल्प प्रवासासाठी खुला होईल अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त व कोस्टल रोड प्रमुख अश्विनी भिडे यांनी एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिली आहे.
हे पण वाचा :- धक्कादायक! ‘या’ शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कांदा विकला असेल तरी अनुदान मिळणार नाही, तुम्ही तर नाहीत ना यादीत
कोस्टल रोड प्रकल्प बाबत थोडक्यात
हा कोस्टल रोड प्रकल्प 2018 मध्ये हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान १०.५८ किमीचा सागरी मार्ग तयार केला जात आहे. प्रकल्पाचे काम हाती घेतल्यानंतर जलद गतीने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आदेश देण्यात आले. मात्र मध्यंतरी राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि यामुळे हे काम थोडं मंद झालं. मात्र आता पुन्हा एकदा या प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू असून आता हा प्रकल्प आगामी काही दिवसात प्रवासासाठी सुरु होणार आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ बँकेत निघाली मेगाभरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, पहा संपूर्ण माहिती
या प्रकल्पासाठी एकूण बारा हजार 950 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कॉस्टल रोडअंतर्गत दोन बोगदे विकसित केले जात असून या दोन्ही बोगद्यांचे काम नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. या प्रकल्पामुळे पेडर रोड, लाला लजपतराय रोड, भुलाभाई देसाई मार्ग आदी दक्षिण मुंबईतील भागांतील वाहतूक कोंडी फुटणार असल्याचा दावा प्रशासनाच्या माध्यमातून केला जात आहे.
या प्रकल्पांतर्गत एकूण तीन ठिकाणी भूमिगत पार्किंगची व्यवस्था राहणार आहे. निश्चितच हा प्रकल्प मुंबईकरांसाठी अति महत्त्वाचा प्रकल्प आहे. आता नोव्हेंबर महिन्यात कोस्टल रोड सुरू होणार असल्याची माहिती समोर आली असल्याने मुंबईकरांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
हे पण वाचा :- मोदी सरकारची मोठी भेट! आता ‘या’ दोन शहरादरम्यान सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस; तारीखही झाली डिक्लेअर, पहा