Banking Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या तरुणांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असेल अशा तरुणांसाठी ही विशेष कामाची बातमी आहे. सारस्वत को-ऑपरेटिव बँक लिमिटेड मध्ये एक मोठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
बँकेकडून यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांना त्वरित अर्ज करण्याचे आव्हान यानिमित्ताने केले जात आहे. बँकेने लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी या पदासाठी ही भरती काढली असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान आज आपण या पदभरती बाबत काही महत्वाची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- राज्यातील तरुणांसाठी खुशखबर ! ‘या’ महापालिकेत होणार मोठी भरती; तब्बल 16,838 रिक्त पदे भरली जाणार, वाचा सविस्तर
कोणत्या आणि किती पदांसाठी निघाली भरती
सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स) या पदासाठी भरती काढण्यात आली असून तब्बल 150 रिक्त पदे या भरतीतून भरली जाणार आहेत.
पदासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र राहील, अर्ज करू शकणार आहे. तरीही अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिसूचना पाहणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करू इच्छिनारा उमेदवार हा 28 वर्षापेक्षा अधिक वयाचा नसावा.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आठ एप्रिल 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.
हे पण वाचा :- सातवी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी निघाली जाहिरात, पगार मिळणार तब्बल 60 हजार, आजच करा अर्ज
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी http://www.saraswatbank.com बँकेच्या या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर होम पेजवर करिअर या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
यानंतर अर्ज दिसेल त्या ठिकाणी क्लिक करा आणि नंतर ओपन झालेला संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरा. यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यानंतर आपला अर्ज यशस्वीरीत्या भरला जाणार आहे. मात्र भविष्यात या भरतीसाठी या अर्जाची प्रिंट आऊट घेणे गरजेचे राहणार आहे.
हे पण वाचा :- 10वी पास महिलांना मुंबईमध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू, वाचा डिटेल्स