Mhada Lottery : मुंबई, पुणे, औरंगाबाद, नासिक यांसारख्या महानगरात आपल्या हक्काचं स्वप्नातलं घर असावं असं स्वप्न अनेकांचे आहे. या महानगरात मात्र घर बांधणं किंवा खरेदी करणे अलीकडे महागल आहे. वाढती महागाई, या महानगरांमधील वाढती लोकसंख्या या सर्वांच्या पार्श्वभूमीवर या महानगरांमध्ये घरांच्या किमती आकाशाला गवसनी घालत असून सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्या आहेत.
अशा परिस्थितीत म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या आणि किमान दरातील घरांकडे सर्वांच्याच नजरा लागून असतात. म्हाडाच्या माध्यमातून आत्तापर्यंत या मोठमोठ्या महानगरांमध्ये अनेकांनी आपल्या घरांची स्वप्नपूर्ती केली आहे. मात्र अद्याप अनेक जण स्वप्नपूर्तीवाचून शिल्लक राहिले आहेत. अशा लोकांची म्हाडाच्या घरांकडे लक्ष लागून आहे. विशेषता मुंबईमधील घरांसंदर्भात अनेकांच्या नजरा लागून आहेत.
मुंबईमधील म्हाडाची सोडत म्हटली म्हणजेच तोबा अर्ज अन तोबा गर्दी. मायानगरी, स्वप्न नगरीमध्ये आपलं स्वतःचं हक्काचे घर असावं असं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या लोकांना आता म्हाडाच्या सोडतीची चाहूल लागून आहे. म्हाडा कडून मात्र अजूनही मुंबईमधील घर सोडतीसंदर्भात माहिती जारी करण्यात आलेली नाही. खरं पाहता मुंबई मंडळाची घर सोडत मार्च महिन्यात येईल असा अंदाज बांधला जात होता.
अनेकांनी या संदर्भात संकेत दिले होते. म्हाडा कडूनच याबाबत माहिती देण्यात आली होती की मार्च महिन्यात मुंबई मंडळाची घर सोडत जारी होईल. मात्र आता मार्च महिना सुरु झाला असून पहिला पंधरवडा उलटला आहे. यामुळे मुंबई मंडळाची घर सोडत कुठे हरवली हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ बहुचर्चीत रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा; 253 कोटींची निविदा जारी
घर सोडत संदर्भात माहिती तर मिळालीच नाही शिवाय घरांची देखील पूर्ण माहिती समोर येऊ शकलेली नाही.आतापर्यंत केवळ वांद्रेमधील घरासंदर्भात माहिती मिळाली आहे. घरांच्या किमती आणि संख्या देखील अजून ठरलेल्या नाहीत. यामुळे घर सोडत मार्च महिन्यात होईल का हाच मोठा प्रश्न आहे. अशातच मात्र म्हाडाच्या विश्वसनीय सूत्रांकडून एका वृत्तसंस्थेला मोठी माहिती देण्यात आली आहे.
सदर वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याअखेरीस म्हाडाच्या मुंबईतील घरांची सविस्तर माहिती आणि किमती निश्चित होतील आणि त्यानंतर जाहिरात, सोडतीचं काम हाती घेतलं जाईल. निश्चितच मुंबई मंडळातील घर सोडत उशिरा कां होईना पण होईल आणि अनेकांचे मायानगरी मुंबईमधील आपले घरांचे स्वप्न पूर्ण होईल हाच आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता कसारा, पनवेल, पालघरहुन CSMT 30 मिनिटात गाठता येणार; लवकरच या रूटवर जलद मेट्रो धावणार