Solapur News : गेल्या महिन्यात महाराष्ट्राला दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली. मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी अशा दोन रूट वर वंदे भारत एक्सप्रेस गेल्या महिन्यात सुरू करण्यात आली. दरम्यान आता मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन बाबत एक मोठी माहिती हाती येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस चा विस्तार करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांकडून तत्वता मान्यता देण्यात आली आहे.
आता मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस कलबुर्गी पर्यंत धावणार आहे. याबाबत कलबुर्गी चे खासदार उमेश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस कलबुर्गी पर्यंत नेण्याचा प्राथमिक निर्णय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे उमेश जाधव याबाबत मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा करत आहेत.
लवकरच त्यांच्या या पाठपुराव्याला अंतिम रूप दिले जाईल अशी आशा यावेळी व्यक्त होत आहे. यामुळे मुंबई सोलापूर वंदे भारतचा विस्तार शक्य होईल आणि कलबुर्गी रेल्वे स्टेशन पर्यंत ही ट्रेन धावेल त्यामुळे कलबुर्गी व परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होईल.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ बहुचर्चीत रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा; 253 कोटींची निविदा जारी
खासदार उमेश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान उमेश जाधव यांनी रेल्वे मंत्र्यांकडे मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला कलबुर्गी पर्यंत नेण्याची विनंती केली. त्यांची ही विनंती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्य केली असून याला तत्वता मान्यता दिली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते सोलापूर दरम्यान धावत आहे. ही ट्रेन राजधानी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी सव्वा चार वाजता सोलापूरला निघते. ही ट्रेन सोलापूर रेल्वे स्थानकावर रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते.
रात्री ही ट्रेन उशिरा पोहोचत असल्याने ही गाडी सोलापुर रेल्वे स्थानकावर मुक्कामाला थांबत असते. यानंतर मग पुन्हा सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी हीच गाडी मुंबईकडे रवाना होत असते. आणि दुपारी साडे बारा दरम्यान मुंबईत ही गाडी पोहोचते.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता कसारा, पनवेल, पालघरहुन CSMT 30 मिनिटात गाठता येणार; लवकरच या रूटवर जलद मेट्रो धावणार
मग पुन्हा ही ट्रेन सोलापूर कडे ठरलेल्या वेळेत धावत असते. अशा परिस्थितीत रात्री सोलापूरला मुक्काम करण्याऐवजी ही ट्रेन कलबुर्गी पर्यंत न्यावी अशी उमेश जाधव यांची मागणी आहे. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. मात्र, तत्वता मान्यता मिळाली असली तरी देखील मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने ज्यावेळी धावेल त्यावेळीच कलबुर्गी पर्यंत ही ट्रेन येईल असं सांगितलं जात आहे.
सध्या स्थितीला ही वंदे भारत ट्रेन 110 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. मात्र येत्या सहा महिन्यात ही ट्रेन 130 किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्यास सक्षम बनेल आणि त्यानंतर या ट्रेनचा विस्तार कलबुर्गी पर्यंत होईल. म्हणजेच ही ट्रेन कलबुर्गीला मुक्काम करत जाईल. निश्चितच यामुळे कलबुर्गी व आजूबाजूच्या परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होईल.