Pune News : पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहरातील बहुचर्चीत मार्गासाठी लवकरच निविदा प्रक्रिया महापालिकेच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. बालभारती ते पौड फाटा या रस्त्याच्या कामासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा रंगत आहेत. मात्र या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागत नव्हता. मात्र आता या रस्त्यांच्या कामासाठी 252 कोटी 13 लाख रुपयाची निविदा लवकरच काढली जाणार आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 2.1 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी सोमवारी निविदा काढली जाणार आहे. शहरातील प्रामुख्याने कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय या भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा उन्नत रस्ता हाती घेण्यात आला आहे. वास्तविक हा रस्ता बांधण्याचं नियोजन 20 वर्षांपासून केले जात आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता कसारा, पनवेल, पालघरहुन CSMT 30 मिनिटात गाठता येणार; लवकरच या रूटवर जलद मेट्रो धावणार
पण यासाठी महापालिकेच्या माध्यमातून निधीची उपलब्धता होत नव्हती. आता या रस्त्यासाठी सोमवारी निविदा काढली जाणार असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून विचारधीन असलेला हा रस्ता आता लवकरच तयार होईल अशी आशा व्यक्त होत आहे. वास्तविक हा रस्ता हनुमान टेकडी आणि एआरएआय टेकडीच्या भागातून प्रस्तावित आहे.
या ठिकाणी मात्र विपुल प्रमाणात वनसंपदा आहे. त्यामुळे रस्ता तयार करताना मोठ्या प्रमाणात झाडे तोडावी लागणार आहेत. अशा परिस्थितीत पर्यावरण प्रेमी तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून या रस्त्याचा विरोध होत होता.
पण यावर आता महापालिकेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात आला आहे. नागरिकांचा विरोध लक्षात घेता महापालिकेच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या बैठका घेण्यात आल्या आणि मग या रोडसाठी सहमती झाली. तदनंतर यासाठी सल्लागार नेमण्यात आला होता.
आता यासाठी सोमवारी निविदा काढली जाईल अशी माहिती व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभागप्रमुख, पुणे महापालिका यांनी दिली आहे. या रस्त्याची लांबी 2.1 किलोमीटर असेल आणि रस्त्याची रुंदी ही 30 मीटर असणार आहे. यासाठी अंदाजे खर्च 252 कोटी 13 लाखांचा असेल.