Maharashtra Ration Card Closed : केंद्र शासन आणि राज्य शासन आपल्या स्तरावर गरिबांसाठी कायमच कल्याणकारी योजना राबवतात. अशा गरजू लोकांना स्वस्तात अन्नधान्य मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून रेशन कार्डची योजना सुरू आहे.
रेशन कार्ड च्या माध्यमातून देशभरातील गरीब जनतेला स्वस्तात अन्नधान्य वितरित केले जात आहे. मात्र शासनाच्या या योजनेचा अनेक अपात्र लोकांनी देखील लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. वास्तविक ही योजना देशातील फक्त गरीब जनतेसाठी सुरू झालेली आहे.
हे पण वाचा :- 10वी पास महिलांना मुंबईमध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू, वाचा डिटेल्स
इतर कोणत्याही शासकीय योजनेप्रमाणेच या योजनेसाठीही काही निकष आणि पात्रता लावून दिल्या आहेत. मात्र असे असतानाही अनेक अपात्र लोकांनी या योजनेअंतर्गत लाभ उचलला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान आता शासनाकडून या अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जारी झाले आहेत.
यासाठी शासनाकडून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. दरम्यान आज आपण कोणते लोक या योजनेसाठी म्हणजे स्वस्त धान्य योजनेकरिता अपात्र राहणार आहेत याबाबत जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- नवयुवक तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ महानगरपालिकेत निघाली मोठी भरती; पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स, पहा डिटेल्स
काय आहेत नवीन नियम
ज्या लोकांनी स्वतःच्या कमाईतून शंभर चौरस मीटरचा फ्लॅट, प्लॉट, दुकान, चार चाकी गाडी, ट्रॅक्टर, शस्त्र परवाना असल्यास तसेच ज्या ग्रामीण भागातील कुटुंबांची वार्षिक मिळकत दोन लाख आणि शहरी भागातील कुटुंबाची वार्षिक मिळकत तीन लाख असेल असे लोक यासाठी आता अपात्र राहणार आहेत. अशा शिधापत्रिका धारकांना आता आपल रेशन कार्ड तहसीलला जमा करावे लागणार आहे.
सरकारने अशा लोकांना आवाहन केले आहे की त्यांनी आपोहून आपले रेशन कार्ड तहसील जमा केले पाहिजे. अन्यथा खाद्य विभाग पडताळणीनंतर अशा लोकांवर कारवाई करून हे कार्ड रद्द करणार आहे शिवाय अशा लोकांवर मग कायदेशीर कारवाई देखील होणार आहे शिवाय त्यांनी घेतलेला रेशनिंगचा लाभ देखील वसूल केला जाणार आहे.
हे पण वाचा :- अखेर ठरलं! ‘या’ दोन शहरादरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन 14 एप्रिलला होणार सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन