Maharashtra Rain : राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी दोन दिवसांपूर्वी एक गोड बातमी आली. ती म्हणजे मान्सूनचे केरळमध्ये दणक्यात आगमन झाले आहे.
केरळमध्ये सध्या मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच अरबी समुद्रामध्ये तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र बनले असून ही वादळी प्रणाली आता हळूहळू उत्तरेकडे सरकू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान देखील तयार होत आहे.
ही निश्चितच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक दिलासादायक बातमी राहणार आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचे आगमन मुंबईमध्ये 18 जूनच्या सुमारास होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मानसून तळ कोकणात दाखल होणार आहे.
हे पण वाचा :- अखेर शासनाला जाग आली ! ‘या’ शेतकऱ्यांना 46 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर, वाचा…
दरम्यान राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या भागात तापमान 40°c च्या आसपास आहे. काही ठिकाणी 36 ते 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मात्र राज्यात आता पूर्व मौसमी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे.
या पावसामुळे साहजिकच थोडा काळ का होईना उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज अर्थातच 10 मे 2023 रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आय एम डी ने राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाची शक्यता वर्तवली असून या संबंधित जिल्ह्यात पावसामुळे आल्हाददायक वातावरण तयार होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- दिलासादायक ! राज्यातील ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार 16 कोटी 48 लाख रुपयाचा निधी; कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची माहिती
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज रविवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ; मध्य महाराष्ट्र येथील जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर ; मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर ; विदर्भ विभागातील अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह पूर्व मौसमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
हे पण वाचा :- डेरिंग केली पण वाया नाही गेली ! नोकरी सोडली, सुरू केल पशुपालन, दूध नाही तर तुपाच्या व्यवसायातून कमवतोय लाखो, वाचा….