Maharashtra Railway Vande Bharat Train : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसची मोठी चर्चा आहे. 2019 मध्ये देशात पहिल्यांदा वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. यानंतर या ट्रेनची वाढती लोकप्रियता पाहता देशातील सर्व महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर ही गाडी चालवण्याचा मानस केंद्र शासनाने बोलून दाखवला आहे. केंद्र शासनाकडून एप्रिल महिन्यात आत्तापर्यंत चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे एप्रिल महिन्यात लवकरच पाचवी वंदे भार एक्सप्रेस सुरू होणार आहे. केरळमध्ये ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल आणि देशाची ही पंधरावी वंदे भारत एक्सप्रेस असेल. या गाडीला पंचवीस एप्रिल 2023 रोजी दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची माहिती इकॉनोमिक टाइम्स या इंग्रजी वृत्तसंस्थेने दिली आहे. विशेष म्हणजे केरळमधील ही पहिलीच वंदे भारत एक्सप्रेस राहणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रालाही एकूण दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी या दोन मार्गांवर फेब्रुवारी महिन्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. शिर्डी हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ. शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दरवर्षी शिर्डीमध्ये येत असतात. रोजाना शिर्डीला हजारोंच्या संख्येने रेल्वे मार्गे भाविक येतात.
यामध्ये राजधानी मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी संपूर्ण राज्यभरातून केली जात होती. यामुळे भारतीय रेल्वेने या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. यासोबतच सोलापूर हे मध्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून मुंबई ते सोलापूर दरम्यान देखील दररोज रेल्वे मार्ग हजारो प्रवासी प्रवास करत असतात.
हे पण वाचा :- भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय ! एप्रिलमध्ये आणखी एक वंदे भारत सुरु होणार; कसा असेल रूट, कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार?, पहा……
यामुळे याही मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. शिर्डी आणि सोलापूर याप्रमाणेच कोल्हापूरला देखील मोठ ऐतिहासिक वैभव प्राप्त आहे. कोल्हापूर शहरातून देखील राजधानी मुंबईकडे रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. तसेच मुंबई मधून देखील कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक कोल्हापूरमध्ये दाखल होतात.
विशेष म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचे हे देवस्थान साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. यामुळे याची महती ही सर्वाधिक आहे. या परिस्थितीत मुंबई ते कोल्हापूर दरम्यान देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली पाहिजे अशी प्रवाशांची मागणी आहे. मुंबई ते कोल्हापूर जर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर याचा लाभ सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना देखील होणार आहे.
हे पण वाचा :- बाळासाहेबांचा नादखुळा ! ‘या’ औषधी पिकाची शेती सुरु केली, मात्र सव्वा तीन महिन्यात लाखोंची कमाई झाली; वाचा ही यशोगाथा
मात्र यासाठी अपेक्षित असा पाठपुरावा होत नसल्याचे चित्र आहे. पण जर या तिन्ही जिल्ह्यातून सामूहिक पाठपुरावा झाला तर लवकरच मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावेल असे मत काही जाणकार व्यक्त करत आहेत. निश्चितच प्रवाशांची ही मागणी पाहता आता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे या संदर्भात पाठपुरावा केला जातो का याकडे विशेष लक्ष राहणार आहे.
विशेष म्हणजे केंद्र शासनाने 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशभरातील एकूण 75 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर ही गाडी सुरू करण्यासाठी जलद प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे जर यावेळी पाठपुरावा केला गेला तर निश्चितच कोल्हापूरला देखील वंदे भारतचा लाभ मिळू शकतो असे मत व्यक्त केले जात आहे.
हे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांना मिळणार मोठ गिफ्ट ! आता Pune-Mumbai वंदे मेट्रो धावणार; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती