Pune-Mumbai Vande Metro : देशात सध्या वंदे भारत एक्सप्रेस च्या मोठ्या चर्चा रंगत आहेत. याचं कारण म्हणजे एप्रिल महिन्यात आत्तापर्यंत एकूण चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाले आहेत.
2019 ते 2022 पर्यंत म्हणजे 3 वर्षात फक्त आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या होत्या आणि 2023 मध्ये अवघ्या चार महिन्यात आतापर्यंत सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत. दरम्यान या वंदे भारत गाडीला प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे. सुपरफास्ट अन आरामदायी प्रवासामुळे अधिकचे भाडे देखील प्रवाशांसाठी त्रासदायक सिद्ध होत नसून या ट्रेनला उलट पसंतीच मिळत आहे.
हे पण वाचा :- अखेर निर्णय झालाच ! 15वी वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ दोन शहरा दरम्यान धावणार, 25 एप्रिलला होणार लाँच, पहा संपूर्ण रूटमॅप
दरम्यान एप्रिल महिन्यातील पाचवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 25 एप्रिल 2023 म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी केरळमध्ये ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार. म्हणजेच ही देशातील पंधरावी वंदे भारत एक्सप्रेस राहणार आहे.
अशातच आता वंदे भारत एक्सप्रेस च्या पुढचं पाऊल भारतीय रेल्वेने टाकल आहे. देशात डिसेंबर 2023 पर्यंत आता वंदे भारतच्या धर्तीवर वंदे मेट्रो सुरु होणार आहेत. दस्तूरखुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत ही वंदे मेट्रो रुळावर धावेल. दरम्यान ही वंदे मेट्रो 100 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील शहरांना परस्परांना जोडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजे जवळ-जवळ वसलेल्या शहरांना यामुळे थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ स्टेशनवर पण थांबणार ! केंद्रीय मंत्र्यांने दिली माहिती
या वंदे मेट्रोमुळे एका शहराहून दुसऱ्या शहरात रोजाना प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. कारण की ही गाडी एका रूट वर दिवसाला चार ते पाच वेळा म्हणजेच लोकल गाडी प्रमाणे धावणार आहे. मात्र ही गाडी 100 किलोमीटर पेक्षा कमी अंतर असलेल्या शहरांनाच जोडणार आहे.
यामुळे मुंबई ते पुणे दरम्यान ही वंदे मेट्रो धावू शकते असा दावा एका मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. निश्चितच मुंबई ते पुणे वंदे मेट्रो सुरु झाली तर राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे यादरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारणार आहे.
यामुळे मुंबईहून पुण्याला रोजाना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, सामान्य नागरिकांना, व्यावसायिकांना तसेच कामगार वर्गाला देखील याचा मोठा बेनिफिट होणार आहे. विशेष बाब म्हणजे या गाडीचे भाडे हे सर्वसामान्यांना परवडेल असच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांना मिळणार मोठ गिफ्ट; आता मुंबई ते ‘या’ शहरादरम्यान धावणार वंदे भारत एक्सप्रेस !