Pune Success Story : अलीकडे शेतीमध्ये शेतकऱ्यांनी मोठा बदल केला आहे. आता पारंपारिक पिकांची शेती करण्याऐवजी औषधी पिकांची शेती शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. पारंपारिक पीकपद्धतीमध्ये अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने औषधी तसेच फळबाग पिकांची शेती शेतकरी करत आहेत. पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील पारंपारिक पिकाला बगल देत औषधी वनस्पती लागवड करून लाखो रुपयांची कमाई केली आहे.
जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या तळेगाव ढमढेरे येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब लक्ष्मण ढमढेरे यांनी चिया या औषधी वनस्पतीची शेती सुरू केली आहे. वास्तविक शिरूर तालुका हा ऊस उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. येथील बहुतांशी शेतकरी ऊस या नगदी पिकाची शेती करतात. मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ऐरणीवर येत आहे.
हे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांना मिळणार मोठ गिफ्ट ! आता Pune-Mumbai वंदे मेट्रो धावणार; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
यावर्षी जरी अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आला नसला तरी देखील उसाचे उत्पादन कमी झाले आहे. परिणामी उस उत्पादकांना याही वर्षी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता ऊस पिकाला पर्यायी पीक म्हणून बाळासाहेब यांनी चिया या औषधी वनस्पतीची शेती सुरू केली आहे.
विशेष म्हणजे प्रायोगिक तत्त्वावर केलेली ही लागवड त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली आहे. बाळासाहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या एक एकर शेत जमिनीत जानेवारी महिन्यातच या पिकाची पेरणी केली. पेरणीसाठी एकरी दोन किलो बियाणे त्यांना लागले. विशेष म्हणजे हे पीक उत्पादित करण्यासाठी त्यांनी रासायनिक खतांचा वापर केला नाही. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने हे पीक उत्पादीत केले आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; पुण्याहून ‘या’ शहरादरम्यान सुरू होणार नवीन सुपरफास्ट ट्रेन, केव्हा होणार सुरु? पहा संपूर्ण माहिती
यामुळे त्यांना एका एकरात यासाठी केवळ 20 हजार रुपये उत्पादन खर्च आला आहे. या एका एकरातून त्यांना पाच ते सहा क्विंटल उत्पादन मिळाले आहे. आता या चालू महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात यापासून त्यांना उत्पादन मिळाले आहे. म्हणजे तीन ते सव्वा तीन महिन्यात यापासून त्यांना उत्पादन मिळाले आहे.
विशेष बाब म्हणजे या चियाला बाजारात पंधरा ते वीस हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. त्यामुळे त्यांना या एक एकरातून एक लाख रुपये मात्र सव्वा तीन महिन्यात मिळाले आहेत. खर्च वजा जाता त्यांना 80 हजार रुपये नफा राहिला आहे. निश्चितच कमी कालावधीमध्ये काढण्यासाठी येणाऱ्या पिकाची शेती करून या प्रयोगशील शेतकऱ्याला चांगली कमाई झाली आहे.
हे पण वाचा :- अखेर निर्णय झालाच ! 15वी वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ दोन शहरा दरम्यान धावणार, 25 एप्रिलला होणार लाँच, पहा संपूर्ण रूटमॅप