Maharashtra Government Job : नोकरीच्या शोधात असलेल्या अन कमी शिक्षण झालेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या तरुणांना मुंबईमध्ये नोकरीची इच्छा असेल अशांसाठी तर ही आनंदाचीच पर्वणी म्हणावी लागेल. कारण की मुंबई हायकोर्टात मोठी भरती निघाली असून सातवी पास उमेदवार यासाठी पात्र राहणार आहेत.
मुंबई हायकोर्टाने यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात शिपाई/हमाल या पदाच्या एकूण 160 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. दरम्यान आज आपण या भरतीबाबत सर्व माहिती तपशीलवार थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ लोकांचे रेशन कार्ड झाले बंद; तहसीलला रेशन कार्ड जमा करण्याचे आवाहन; यादीत तुम्हीही आहात का?
कोणत्या आणि किती रिक्त पदांसाठी होणार भरती
Mumbai High Court मध्ये शिपाई/हमाल या पदाच्या एकूण 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या पदासाठी सातवी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. 18 ते 38 वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत. मागासवर्गीय उमेदवारांना तीन ते पाच वर्षे वयोगटात सुट राहणार आहे. मात्र अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना एकदा काळजीपूर्वक वाचणे गरजेचे राहणार आहे.
अर्ज कसा करायचा
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php या लिंक वर जाऊन आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकणार आहेत.
हे पण वाचा :- 10वी पास महिलांना मुंबईमध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू, वाचा डिटेल्स
अर्ज करण्याची अंतिम दिनांक
या पदासाठी 27 मार्च 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच सात एप्रिल 2023 पर्यंत ही अर्ज प्रक्रिया सुरू राहणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना विहित कालावधीमध्ये आपला अर्ज सादर करावा लागणार आहे.
किती मिळणार पगार
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 60,000 पर्यंतचा पगार मिळणार आहे.
जाहिरात कुठे पाहणार
मुंबई हायकोर्टाच्या माध्यमातून या पदासाठी निघालेली जाहिरात पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/15uFzh02qAR0RmARdqVSiQYGAjg0MtYTg/view या लिंक वर क्लिक करा. या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी मात्र इच्छुक उमेदवारांनी जाहिरात संपूर्ण काळजीपूर्वक वाचणे गरजेचे राहणार आहे.
हे पण वाचा :- नवयुवक तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ महानगरपालिकेत निघाली मोठी भरती; पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स, पहा डिटेल्स