Maharashtra Farmer Scheme : भारत हा शेतीप्रधान देश आहे. येथील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे. साहजिकच देशाची अर्थव्यवस्था ही देखील शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शेती व्यवसायाला उभारी देण्यासाठी शासनाकडून कायमच प्रयत्न केले जातात.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांनी अधिकाधिक उत्पन्न शेतीमधून मिळवावे यासाठी शासन कायम प्रयत्न करत असते. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण अशा योजना शासनाकडून सुरू केल्या जातात. अशातच, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अशीच एक कल्याणकारी योजना सुरू केली आहे जिचे नाव आहे पीएम किसान सन्मान निधी योजना.
हे पण वाचा :- भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय ! एप्रिलमध्ये आणखी एक वंदे भारत सुरु होणार; कसा असेल रूट, कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार?, पहा……
विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या या योजनेच्या धरतीवर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात केली आहे. एकंदरीत केंद्र शासन आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी आपापल्या स्तरावर जोमात काम करत आहे. मात्र, अशातच पी एम किसान योजनेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांशी अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातील शेतकऱ्यांनी देखील पीएम किसानचा अपात्र असूनही लाभ घेतला आहे. दरम्यान आता अशा अपात्र शेतकऱ्यांकडून पैशांची वसुली केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील 8628 अपात्र शेतकऱ्यांनी अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेतला आहे.
हे पण वाचा :- बाळासाहेबांचा नादखुळा ! ‘या’ औषधी पिकाची शेती सुरु केली, मात्र सव्वा तीन महिन्यात लाखोंची कमाई झाली; वाचा ही यशोगाथा
या शेतकऱ्यांनी जवळपास दहा कोटी 41 लाख रुपयांचा आतापर्यंत लाभ घेतला असून आता या शेतकऱ्यांकडून वसुली केली जाणार आहे. विशेष बाब अशी की या शेतकऱ्यांना आतापर्यंत वारंवार सूचना देऊनही या शेतकऱ्यांनी या योजनेचा पैसा परत केलेला नाही परिणामी आता या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढवला जाणार आहे.
वास्तविक, जिल्ह्यातील दहा हजार 480 अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र शासनाकडून नोटीस प्राप्त झाल्यानंतर 1852 शेतकऱ्यांनी पैसा परत केला आहे. पण उर्वरित शेतकऱ्यांनी अद्याप पैसा परत केलेला नाही यामुळे अशा शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढवण्याचा मोठा निर्णय झाला आहे.
हे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांना मिळणार मोठ गिफ्ट ! आता Pune-Mumbai वंदे मेट्रो धावणार; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती