Indian Railway Breaking News : भारतीय रेल्वेच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता भारतीय रेल्वे एप्रिल महिन्यात आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आगामी वर्षात देशात लोकसभा निवडणुका सुरू होणार आहेत. तसेच काही प्रमुख राज्यात विधानसभा निवडणुका देखील आहेत.
आता साहजिकच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळी विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. तसेच देशातील काही प्रमुख रेल्वे मार्गांवर केंद्र शासनाच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेस ही प्रवाशांमध्ये कमी कालावधीमध्ये लोकप्रिय ठरलेली गाडी देखील सुरु केली जात आहे. दरम्यान एप्रिल महिन्यात आत्तापर्यंत चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत.
हे पण वाचा :- बाळासाहेबांचा नादखुळा ! ‘या’ औषधी पिकाची शेती सुरु केली, मात्र सव्वा तीन महिन्यात लाखोंची कमाई झाली; वाचा ही यशोगाथा
आता या महिन्यातील पाचव्या वंदे भारत एक्सप्रेस ला लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. द स्टेट्समन या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 25 एप्रिलला आणखी एक वंदे भारत गाडी सुरू होणार आहे. देशातील ही पंधरावी वंदे भारत एक्सप्रेस राहणार असून ही गाडी केरळमध्ये सुरू होईल.
ही नवीन ट्रेन तिरुअनंतपुरम आणि कन्नूर दरम्यान चालवली जाणार आहे, ज्यामुळे केरळच्या प्रवाशांना जलद वाहतुकीचा मार्ग उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. 16 सेल्फ-प्रोपेल्ड डब्यांसह वंदे भारत क्रमांक 13 चा रिकामा रेक गुरुवारी म्हणजे 13 एप्रिल 2023 रोजी रात्री 11 वाजता चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्यातून निघाला आणि शुक्रवारी संध्याकाळी तिरुवनंतपुरममधील कोचुवेली येथे पोहोचला.
हे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांना मिळणार मोठ गिफ्ट ! आता Pune-Mumbai वंदे मेट्रो धावणार; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
हाती आलेल्या माहितीनुसार, युवम युवा परिषदेसाठी 24 एप्रिल रोजी केरळ येथील एर्नाकुलम येथे पंतप्रधान मोदी येणार आहेत. या केरळ दौऱ्यामध्ये या पंधराव्या वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा मोदी दाखवणार आहेत. यासाठी 25 एप्रिलला मोदी तिरुअनंतपुरमला जाणार आहेत आणि तिरुअनंतपुरम-कन्नूर वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे.
ही गाडी तिरुअनंतपुरम-शोरनूर सेक्टरवर ताशी 80-90km आणि शोरानूर-कन्नूर सेक्टरवर 100-110km प्रति तास वेगाने धावेल अशी माहिती देखील संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी वृत्तसंस्थेला दिली आहे. कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम शहर, त्रिशूर, तिरूर, कोझिकोडे या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबणार असल्याची माहिती देखील अधिकार्यांनी दिली आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; पुण्याहून ‘या’ शहरादरम्यान सुरू होणार नवीन सुपरफास्ट ट्रेन, केव्हा होणार सुरु? पहा संपूर्ण माहिती