NHAI Expressway : गेल्या काही वर्षांपासून राज्यासह संपूर्ण देशात मोठ-मोठ्या महामार्गाची कामे पूर्ण केली जात आहेत. आपल्या राज्यातही विविध महामार्गाची कामे सुरू आहेत. समृद्धी महामार्ग हा त्यापैकीच एक आहे. उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबई या दरम्यान हा महामार्ग विकसित केला जात आहे. या मार्गाचे आत्तापर्यंत 600 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. हा एकूण 701 किलोमीटर लांबीचा मार्ग असून उर्वरित 100 किलोमीटरचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाचा नागपूर ते भरवीर हा मार्ग पूर्ण झाला आहे आणि भरवीर ते मुंबई दरम्यान लवकरच हा मार्ग पूर्ण होणार आहे. येत्या काही महिन्यात संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊ शकतो असा दावा काही…
Author: Krushi Marathi
Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील एक लोकप्रिय ट्रेन आहे. या ट्रेनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी, शताब्दी यांसारख्या एक्सप्रेस ट्रेनला देखील वंदे भारत एक्सप्रेसने लोकप्रियच्या बाबतीत धोबीपछाड दिली आहे. ही हाय स्पीड ट्रेन कमाल 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम आहे. या गाडीमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत. या गाडीमुळे प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव घेता येत आहे. परिणामी या गाडीला प्रवाशांनी विशेष पसंती दाखवली आहे. हेच कारण आहे की भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्याचे नियोजन आखले जात आहे. नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य…
Pune Successful Farmer : पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला पुणे जिल्हा सुंदरतेने परिपूर्ण आहे. हा जिल्हा एक सधन जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील शेतकरी बांधव विविध नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करतात. जिल्ह्यात प्रामुख्याने भात, ऊस, द्राक्ष, डाळिंब, कांदा यांसारख्या पिकांची लागवड पाहायला मिळते. मात्र झाडांची शेती कोणीही करत नाही. चंदन, मलबार निम, निलगिरी यांसारख्या झाडांची फारशी लागवड पाहायला मिळत नाही. मात्र पुणे जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने चंदन लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. या शेतकऱ्याला आता येत्या तीन-चार वर्षात करोडो रुपयांची कमाई होईल असा अंदाज आहे. इंदापूर तालुक्यातील मौजे बेलवाडी येथील शहाजी धोंडीबा शिंदे यांनी ही किमया साधली आहे. शिंदे…
MSRT Bus : राज्यात एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी प्रामुख्याने एसटी महामंडळाच्या बसचा वापर केला जातो. प्रामुख्याने ज्या शहरांमध्ये जाण्यासाठी थेट रेल्वेची सुविधा नाही अशा ठिकाणी एसटी बसचा वापर होतो. एसटी बसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एसटी महामंडळ देखील नेहमीच वेगवेगळे निर्णय घेत असते. वेगवेगळे कल्याणकारी निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून केला जातो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाचे प्रवासी संख्या वाढवण्यासाठी महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीमध्ये 100% सवलत मिळत आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एसटी मधून मोफत प्रवास करता येत आहे. अशातच आता राज्यातील एसटी…
Havaman Andaj : राज्यासह देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. तापमानात चढ-उतार सुरू आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यासह देशाच्या दक्षिण भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसला. दरम्यान दक्षिणेकडील राज्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे तेथे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चेन्नईमध्ये तर शहरात पूरस्थिती निर्माण झाली यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने आगामी चार ते पाच दिवस महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 13 डिसेंबर पर्यंत पाऊस पडणार असा अंदाज आहे. हवामान विभागाच्या…
Wheat Farming : गहू हे राज्यासह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. या अन्नधान्य पिकाची लागवड महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांसारख्या अनेक प्रांतात केली जाते. यामुळे भारतात गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेष म्हणजे गव्हाची खपत देखील आपल्या भारतात खूपच अधिक आहे. गहू बेकरी प्रॉडक्ट, मैदा, पोळी बनवण्यासाठी तसेच फूड इंडस्ट्री मध्ये वापरले जाते. परिणामी बाजारात गव्हाची मोठी मागणी असते. गेल्या काही वर्षांपासून गव्हाला चांगला भावही मिळत आहे. गहू हे रब्बी हंगामात उत्पादित होते. यंदा मात्र मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला असल्याने रब्बी हंगामातील गहू लागवडीखालील क्षेत्र किंचित कमी होण्याची शक्यता…
Mumbai News : मुंबईची तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेल्या वाडा तालुक्यातील गारगाई प्रकल्पाचे काम येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण सर्वेक्षण झाले असून, विस्थापित होणाऱ्या एक हजाराहून अधिक कुटुंबीयांनाही सद्यस्थितीत असलेल्या घराची किंमत, जमिनीची किंमत, फळझाडाची किंमत, कशा प्रकारे द्यायचे हे निश्चित करण्यात आले. मात्र या प्रकल्पासाठी परिसरातील जंगलातील व अभयारण्यातील सुमारे ४.५ लाख झाडांना जलसमाधी मिळणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणात पैसे मोजून अन्य जिल्ह्यांत जागा खरेदी करून त्याठिकाणी तिप्पट झाडे लावण्याचे आश्वासन दिले आहे. वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात हा प्रकल्प होत आहे. प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेने दोन वर्षांपासून सर्व्हेक्षण केले…
Cyclone Michaung : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील विविध भागांमध्ये पाऊस सुरु आहे. महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात 25 तारखेपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला आहे. 26 नोव्हेंबरला तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लाल कांदा, रांगडा कांदा, द्राक्ष, हार्वेस्टिंग साठी तयार झालेल्या कापसाचे अन तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने आज देखील राज्यातील बहुतांशी भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज दिला आहे. आज राज्यातील…
Mumbai Trans Harbour Link Project : राजधानी मुंबईमधील जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे अपडेट समोर आली आहे. ही अपडेट आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाबाबत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित होत असलेला एक शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. दरम्यान या प्रकल्पाबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रकल्प 25 डिसेंबर 2023 रोजी अर्थातच माजी पंतप्रधान दिवंगत श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनानिमित्त सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र आता हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण अवघड असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे…
Panjab Dakh News : भारतीय हवामान विभागाने 28 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. आज नासिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची आणि काही ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यातील मराठवाडा विभागातील दोन जिल्हे वगळता आणि विदर्भ विभागातील दोन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आज अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. म्हणजेच आज राज्यातील जवळपास 31 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उद्या आणि…