देशातील सर्वात लांब सागरी पूल जानेवारी 2024 मध्ये होणार खुला ! | Mumbai Trans Harbour Link Project

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Trans Harbour Link Project : राजधानी मुंबईमधील जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे अपडेट समोर आली आहे. ही अपडेट आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाबाबत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित होत असलेला एक शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे.

दरम्यान या प्रकल्पाबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रकल्प 25 डिसेंबर 2023 रोजी अर्थातच माजी पंतप्रधान दिवंगत श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनानिमित्त सुरू करण्याचे नियोजन होते.

मात्र आता हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण अवघड असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे हा प्रकल्प 25 डिसेंबरला सुरू होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत होण्याची आशा आहे. तथापि हा प्रकल्प आता 25 डिसेंबरला सुरू होणार नाही.

पण हा प्रकल्प नवीन वर्षात अगदी सुरुवातीलाचं सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाणार आहे. फडणवीस यांनी एमटीएचएल प्रकल्प जानेवारी 2024 अखेरपर्यंत सुरू होणार असा विश्वास बोलून दाखवला आहे. अर्थातच नवीन वर्षात हा प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे.

खरंतर या प्रकल्पा अंतर्गत शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान 22 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू विकसित केला जाणार आहे. हा देशातील सर्वाधिक लांबीचा पहिला-वहिला समुद्रावरील पूल राहणार आहे. या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास गतिमान होणार आहे.

या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर मात्र 15 ते 20 मिनिटात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. एवढेच नाही तरी यामुळे मुंबई ते पुणे या दरम्यानचा प्रवास देखील 90 मिनिटे लवकर पूर्ण होणार आहे. दरम्यान आता आपण या प्रकल्पाच्या काही विशेषता थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

देशातील सर्वात लांब सागरी पूल : हा पूल खुला झाल्यानंतर देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल म्हणून ओळखला जाणार आहे. 22 किमी लांबीच्या या पुलाचा जवळपास 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रावर आहे आणि उर्वरित भाग जमिनीवर आहे.

म्हणून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला आता देशातील सर्वात लांब सागरी पूल म्हणून ओळखले जाणार आहे. जगातील सर्वोत्कृष्ट अन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या पुलामध्ये करण्यात आला आहे. या पुलाला माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे.

60 मिनिटांचा प्रवास होणार 15 मिनिटात : या प्रकल्पामुळे मुंबईचे नवी मुंबई हा 60 मिनिटांचा प्रवास फक्त पंधरा मिनिटात पूर्ण होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन पुणे, बेंगळुरू आणि गोवा या प्रमुख शहरांमध्ये जलद गतीने पोहोचता येणार आहे.

ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक तंत्रज्ञानाचा वापर : हा सागरी पूल भारतातील पहिला सागरी पूल असेल, जो ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात आला आहे. हा जगातील सर्वात मजबूत पूलांपैकी एक राहणार आहे.

काँक्रीटचा सर्वाधिक वापर झाला आहे : यात 9,75,000 घनमीटर काँक्रीट वापरण्यात आले जे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसाठी वापरण्यात आलेल्या काँक्रीटच्या सहा पट अधिक असल्याची माहिती जाणकार लोकांनी दिली आहे आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा