पंजाब डख नवीन हवामान अंदाज : राज्यात ‘या’ तारखेपर्यंत बरसणार मुसळधार पाऊस ! कोणत्या भागात अवकाळी लावणार हजेरी ? वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh News : भारतीय हवामान विभागाने 28 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.

आज नासिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची आणि काही ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यातील मराठवाडा विभागातील दोन जिल्हे वगळता आणि विदर्भ विभागातील दोन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आज अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

म्हणजेच आज राज्यातील जवळपास 31 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उद्या आणि परवा देखील राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. राज्यात आता 27 नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पावसाची हजेरी लागणार आहे. म्हणजेच राज्यात आज आणि उद्या अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण विभागात अवकाळी पाऊस होईल असे त्यांनी सांगितले आहे. मात्र या कालावधीत पडणारा पाऊस हा सर्वदूर पडणार नाही तर काही तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे.

एखाद्या जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडेल तर काही भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, असे त्यांनी नमूद केले आहे. पण या कालावधीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पंजाबरावांनी केले आहे.

यामुळे आता हवामान खात्याचा आणि ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज खरा ठरतो का आणि महाराष्ट्रात खरंच अवकाळी पाऊस बरसतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा