Vande Bharat Train : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. वास्तविक ही ट्रेन जानेवारी महिन्यातच सुरू होणार होती मात्र काही तांत्रिक अडथळ्यांमुळे या ट्रेनचा शुभारंभ फेब्रुवारीमध्ये करण्यात आला. ट्रेनची सुरुवात झाली आणि प्रवाशांनी या ट्रेनला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली.
यामुळे सोलापूर वासियांचा पुणे आणि मुंबईकडील प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत होत आहे. सोबतच पुणे वासीयांना देखील मुंबई आणि सोलापूरकडील प्रवास सोयीचा झाला आहे. दरम्यान आता या वंदे भारत ट्रेन बाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही ट्रेन आता कलबुर्गीपर्यंत धावणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे ही ट्रेन मुंबईहुन सोलापूर पर्यंत धावते आणि सोलापूरला मुक्काम राहते.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘असं’ झालं तर कापूस दर वाढणार; पहा काय म्हणताय तज्ञ
मात्र आता ही ट्रेन सोलापूरला मुक्काम न राहता कलबुर्गी पर्यंत जाणार आहे. याबाबत कलबुर्गीचे खासदार उमेश जाधव यांनी सांगितले की, मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन कलबुर्गी पर्यंत धावावी अशी मागणी त्यांची होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत अश्विनी वैष्णव यांनी ही ट्रेन कलबुर्गी पर्यंत धावण्यास तत्वता मान्यता दिली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी याबाबतचा प्राथमिक निर्णय घेतला असून खासदार उमेश जाधव यांचा यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरु आहे. खासदार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन कलबुर्गी पर्यंत धावावी अशी विनंती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव कडे केली.
ही विनंती ऐकून घेतल्यानंतर रेल्वेमंत्री यांनी त्याला तत्वता मान्यता दिली आहे. याबाबतचा अधिकारीक निर्णय अजून झालेला नसला तरी देखील रेल्वेमंत्र्यांनी तत्वता मान्यता दिली असल्याने येत्या काही दिवसात कलबुर्गी रेल्वे स्टेशन पर्यंत ही ट्रेन धावणार आहे.
हे पण वाचा :- Mhada Lottery : अखेर ठरलं ! म्हाडाच्या मुंबईतील घरांसंदर्भात मोठी अपडेट; ‘या’ महिन्यात जारी होणार सोडत
केव्हा कलबुर्गीपर्यंत धावणार वंदे भारत ट्रेन
सध्या स्थितीला मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन ताशी 110 किलोमीटर वेगाने धावत आहे. येत्या काही दिवसात मात्र ही ट्रेन 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहे. सहा महिन्यात या ट्रेनचा वेग वाढेल अशी आशा व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत या ट्रेनचा वेग वाढल्यानंतर ही ट्रेन सोलापूरला मुक्काम न राहता कलबुर्गी पर्यंत धावेल अशी आशा व्यक्त होत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सी एस एम टी सोलापूर वंदे भारत ट्रेन दुपारी सव्वाचार वाजता सोलापूरला निघते. रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी ही ट्रेन सोलापूरला पोहोचते आणि त्या ठिकाणी मुक्काम राहते. तदनंतर ही गाडी पुन्हा सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी मुंबईकडे रवाना होते. मुंबईमध्ये ही ट्रेन दुपारी साडेबारा दरम्यान पोहचते.
दरम्यान आता सोलापूरला मुक्काम ठेवण्यापेक्षा मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन ला कलबुर्गी पर्यंत नेण्याचे प्रयत्न रेल्वे मंत्रालयाकडून सुरू आहेत. निश्चितच हे प्रयत्न जर सत्यात उतरले तर कलबुर्गी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होईल.