Vande Bharat Railway : सध्या देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या चर्चा जोमात आहेत. रेल्वेच्या माध्यमातून देखील वंदे भारत एक्सप्रेस चे नेटवर्क वेगाने वाढवण्याचे काम सुरू आहे. पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने देशभरात वेगवेगळ्या रूटवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून देखील प्रयत्न केले जात आहेत.
सध्या स्थितीला देशात दहा वंदे भारत ट्रेन सुरू असून यापैकी चार वंदे भारत ट्रेन आपल्या महाराष्ट्रात धावत आहेत. आगामी काही वर्षात मात्र 400 वंदे भारत ट्रेन संपूर्ण देशभरात सुरू करण्याची योजना रेल्वेने आखली आहे. तूर्तास वंदे भारत चेअर कार स्वरूपात आहेत मात्र येत्या काही दिवसात यामध्ये स्लीपर कोच देखील तयार होणार आहेत.
स्लीपर कोच असणारी वंदे भारत ट्रेन 220 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असेल असं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे वंदे भारत ट्रेन येत्या काही वर्षात शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसला कालबाह्य ठरवणार आहे. म्हणजे आता देशात शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस ऐवजी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा मानस रेल्वेचा आहे.
हे पण वाचा :- नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला मिळणार गती, 16,039 कोटी रुपये खर्च, 235 किलोमीटर लांबी; ‘त्या’ 102 गावात सुरू होणार भूसंपादन
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे, जी भारतीय ट्रेन दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातल्या प्रकल्पांपैकी एक आहे. या ट्रेनची निर्मिती पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. ही ट्रेन रेल्वेची उपकंपनी असलेल्या चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) द्वारे विकसित आणि डिझाइन करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या ट्रेनची निर्मिती आता लातूर मधील फॅक्टरीमध्ये देखील होणार आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीची ही ट्रेन आकर्षक, आधुनिक आणि पूर्णपणे वातानुकूलित असून, प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सेवा या ट्रेनमध्ये दिल्या जात आहेत. या ट्रेनला इतर एक्सप्रेसच्या तुलनेत अधिक स्पीड असल्याने यामुळे भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलला जात असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत.
येत्या दोन वर्षांत 400 वंदे भारत गाड्या देशातील विविध मार्गांवर सुरू केल्या जाणार आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्लीपर आवृत्तीचे डबे अॅल्युमिनियमचे बनलेले असतील आणि ते ताशी 220 किलोमीटर वेगाने धावण्यासाठी डिझाइन केले जातील.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता कलबुर्गीपर्यंत धावणार; रूटमध्ये आणि वेळेत बदल होणार का? वाचा सविस्तर
काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन वर्षात ज्या 400 वंदे भारत धावतील त्यापैकी 200 वंदे भारत ट्रेन याचे सरकार असतील आणि 200 वंदे भारत ट्रेन या स्लीपर कोच वाल्या असतील. चेरकार वंदे भारत एक्सप्रेस या 180 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास सक्षम बनवल्या जात आहेत, मात्र असे असले तरी याचेअरकार वंदे भारत ट्रेन कमर्शियल उपयोगासाठी 130 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास सक्षम राहणार आहेत.
तसेच चेअर कार वंदे भारत एक्सप्रेस या शताब्दी एक्सप्रेस ऐवजी चालवल्या जातील आणि स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेस या राजधानी एक्सप्रेस ऐवजी चालवल्या जातील असं काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगितलं आहे. निश्चितच येत्या काही दिवसात शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस ऐवजी वंदे भारत ट्रेनचं धावतील असा प्लॅन रेल्वेच्या माध्यमातून तयार केला जात असून यामुळे भारतीय रेल्वेला मोठा फायदा होईल असे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात या रूट वर धावतात वंदे भारत ट्रेन
राज्यात एकूण चार वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. यापैकी मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी एक्सप्रेस ला नुकताच हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. तसेच मुंबई-गांधीनगर आणि नागपूर-बिलासपूर दरम्यान देखील वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘असं’ झालं तर कापूस दर वाढणार; पहा काय म्हणताय तज्ञ