Nashik Pune Railway : नासिक-पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे बाबत गेल्या काही दिवसांपासून मोठ रणकंदन पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात महारेलच्या माध्यमातून नासिक जिल्हाधिकाऱ्याला एक पत्र पाठवण्यात आलं आणि या रेल्वे मार्गासाठी होत असलेलं भूसंपादन आणि जमीन मूल्यांकनाचे काम तूर्तास थांबवण्याची विनंती करण्यात आली.
तदनंतर मात्र एक मार्च रोजी पुन्हा एकदा महारेलने पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलं आणि पुन्हा एकदा भूसंपादन करण्यासाठी सूचना दिल्या. दरम्यान आता या रेल्वेमार्गासाठी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यामुळे हा रेल्वे मार्ग प्रकल्प आता जलद गतीने पूर्ण करण्यास प्रयत्न केले जातील अशी आशा व्यक्त होत आहे.
या रेल्वे प्रकल्पाबाबत अधिक माहिती अशी की या मार्गाला नुकतेच महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र रेल डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनने या मार्गाचे काम हाती घेतले असून साडेतीन ते चार वर्षात हा रेल्वे मार्ग प्रकल्प पूर्ण करण्याचा टार्गेट ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा महारेलच्या माध्यमातून तयार झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील एकूण चार तालुक्यात आणि 54 गावात हा महामार्ग प्रस्तावित आहे. पुणे आणि नासिक अशा दोन्ही जिल्ह्यातील एकूण 102 गावांमध्ये हा रेल्वे मार्ग प्रकल्प जाणार आहे. दरम्यान आज आपण या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता कलबुर्गीपर्यंत धावणार; रूटमध्ये आणि वेळेत बदल होणार का? वाचा सविस्तर
पुणे नासिक सेमी हाय स्पीड रेल्वेच्या विशेषता
हा रेल्वे मार्ग प्रकल्प एकूण 235 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 18 बोगदे उभारले जातील. तसेच यामध्ये एकूण 19 उड्डाणपुले आणि 20 स्थानके तयार केले जाणार आहेत. हा रेल्वे मार्ग प्रकल्प विद्युतीकरण असलेला दुहेरी मार्ग प्रकल्प राहील. सुरुवातीला सहा कोच असतील त्यानंतर 12 ते 16 कोच बसवणे प्रस्तावित आहे.
सुरवातीला या रेल्वे मार्गावर दोनशे किलोमीटर प्रतितास या वेगाने रेल्वे धावेल तर नंतर 250 किलोमीटर प्रति तास या वेगाने रेल्वे चालवले जाणार आहे. या प्रकल्पासाठी 16 हजार 39 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास मात्र पावणे दोन तासात शक्य होणार आहे. साहजिक या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक या दोन शहरांदरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘असं’ झालं तर कापूस दर वाढणार; पहा काय म्हणताय तज्ञ
शिक्षणाचे माहेरघर पुणे आणि वाईन सिटी म्हणून प्रसिद्ध असलेले नाशिक या रेल्वे मार्गामुळे थेट जोडले जाईल आणि या भागातील कृषी, पर्यटन, शिक्षण, उद्योग जगताला नवीन उभारी मिळणार आहे. हा रेल्वे मार्ग प्रकल्प पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव, संगमनेर, जुन्नर, सिन्नर नाशिक या प्रमुख तालुक्यातून जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत चाकण, मंचर, नारायणगाव, एलिफंटा आणि संगमनेरला प्रमुख स्थानके राहणार आहेत. या रेल्वे मार्गावर मालवाहतुकीसाठी लोडिंग आणि अनलोडींग ची सुविधा राहणार आहे. प्रकल्प काम सुरू झाल्यानंतर मात्र 1200 दिवसात प्रकल्प कार्यान्वित करण्याच टार्गेट ठेवण्यात आला आहे. या रेल्वे मार्गावर मालवाहतूक आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्या धावणार आहेत.
हे पण वाचा :- Mhada Lottery : अखेर ठरलं ! म्हाडाच्या मुंबईतील घरांसंदर्भात मोठी अपडेट; ‘या’ महिन्यात जारी होणार सोडत