Vande Bharat Metro Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वाधिक चर्चेची आणि लोकप्रिय ट्रेन. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये धावली होती. सध्या ही गाडी देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा अकरा वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत.
राज्यातील सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांनी आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे. दुसरीकडे वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर वंदे भारत मेट्रो आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू होणार आहेत. वंदे भारत मेट्रो तर सुरू देखील झाली आहे.
अहमदाबाद ते भुज या दरम्यान पहिली वंदे भारत मेट्रो सुरु झाली आहे. अशातच आता देशातील आणखी पाच महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत मेट्रो सुरु होऊ शकते असा दावा केला जातोय. वंदे भारत मेट्रो उत्तर प्रदेश राज्यातील पाच मार्गांवर धावणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.
उत्तर प्रदेश मधील लखनऊ ला या पाच गाड्या मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ही ट्रेन लखनऊ ते कानपूर मार्गावर धावणार आहे. यानंतर लखनऊ ते प्रयागराज, वाराणसी, अयोध्या, गोरखपूर या मार्गावर मेट्रोच्या धर्तीवर वंदे भारत मेट्रो गाड्या चालवल्या जातील.
त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकंदरीत गुजरात नंतर आता उत्तर प्रदेश राज्याला देखील वंदे भारत मेट्रो ट्रेनची भेट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कधीपर्यंत वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दुसरीकडे वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील लवकरच रुळावर धावताना दिसणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन नवी दिल्ली ते सिकंदराबाद या मार्गावर सुरू होण्याची शक्यता आहे. आपल्या महाराष्ट्राला देखील वंदे भारत स्लीपरची भेट मिळणार असे बोलले जात आहे.