Vande Bharat Express Maharashtra News : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक मोठी माहिती दिली आहे. Vande Bharat Train ही गाडी भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरु करण्यात आली आहे. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे
भारतीय रेल्वे प्रवाशांना युरोपियन देशांप्रमाणेच रेल्वेच्या प्रवासाचा आनंद घेता यावा याच दृष्टिकोनातून या एक्सप्रेसची सुरुवात करण्यात आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस जवळपास 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम आहे. जरी ती पूर्ण क्षमतेने अजून देशातील कोणत्याच मार्गावर धावत नसते तरीदेखील या गाडीचा वेग हा राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेस च्या तुलनेत अधिक आहे.
हे पण वाचा :- मुंबई, नागपूरवासियांसाठी महत्वाची बातमी; दुरांतो एक्सप्रेस आता ‘या’ रेल्वे स्टेशनलाही थांबणार !
हेच कारण आहे की वंदे भारत एक्सप्रेस मुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा अधिक गतिमान झाला आहे. शिवाय या गाडीमुळे प्रवास हा आरामदायी बनला आहे. परिणामी या गाडीला प्रवाशांचे अधिक पसंती असून महागडे तिकीट दर असताना देखील प्रवासी याच गाडीने प्रवास करण्यात उत्सुक आहेत.
यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील प्रमुख रेल्वे मार्गावर ही गाडी सुरू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठा दावा केला आहे. दानवे यांच्या म्हणण्यानुसार, जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये लातूर येथील कोच फॅक्टरी मध्ये या गाडीची निर्मिती सुरू होणार आहे.
हे पण वाचा :- म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीच्या पात्र अर्जाची यादी ‘या’ दिवशी निघणार ! पहा संपूर्ण वेळापत्रक
रविवारी दानवे यांनी लातूर येथील कोच फॅक्टरी ला भेट दिली असता त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. दानवे म्हणाले, की येत्या सात वर्षांमध्ये येथून 120 रेल्वे बाहेर पडणार आहेत. मग त्यानंतर गरज पडल्यास पुन्हा 80 वंदे भारत रेल्वेचे काम हे लातूरच्या कारखान्यात होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
वास्तविक आतापर्यंत देशात वंदे भारतच्या डब्यातील आसन व्यवस्था बसण्यासाठी केलेली आहे. पण लातूरच्या रेल्वे डबेनिर्मिती कारखान्यात ‘बर्थ’च्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. म्हणजे वंदे भारत स्लीपर कोच डब्बे या कारखान्यात तयार होणार आहेत. निश्चितच आगामी काही दिवसात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वंदे भारत स्लीपर कोच देखील सुरू होणार असल्याचे हे संकेत आहेत.