मुंबई, नागपूरवासियांसाठी महत्वाची बातमी; दुरांतो एक्सप्रेस आता ‘या’ रेल्वे स्टेशनलाही थांबणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Nagpur Duranto Express New Halt : मुंबई आणि नागपूर या दोन शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी कामानिमित्त प्रवास करत असतात. मुंबई राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी.

हे केवळ कॅपिटल शहर आहे असे नाही तर हे एक प्रमुख औद्योगिक शहर देखील आहे. यामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणात रोजगार निमित्त किंवा इतर अन्य कामासाठी नागरिक मुंबईला जात असतात. व्यावसायिक, विद्यार्थी, कामगार यांचा एक मोठा गट रोजाना मुंबईकडे रेल्वेने प्रवास करत असतो.

हे पण वाचा :- म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीच्या पात्र अर्जाची यादी ‘या’ दिवशी निघणार ! पहा संपूर्ण वेळापत्रक

नागपूर किंवा विदर्भातून मुंबईकडे प्रवास करायचा म्हटला तर विदर्भवासियांची पहिली पसंत असते ती दुरंतो एक्सप्रेसला. मुंबई नागपूर दुरांतो एक्सप्रेसने हजारो विदर्भवासी मुंबईकडे प्रवास करतात. दरम्यान मध्ये रेल्वेच्या माध्यमातून दुरांतो एक्सप्रेस बाबत नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने या एक्सप्रेसला एक अतिरिक्त थांबा दिला आहे. आता ही गाडी अमरावती येथील बडनेरा या रेल्वे स्थानकावर देखील थांबणार आहे. मात्र मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयानंतर विदर्भातील काही जिल्ह्यातील प्रवाशांच्या माध्यमातून विरोध व्यक्त केला जात आहे.

मध्य रेल्वेने हा निर्णय तात्काळ रद्द करावा आणि या गाडीला वर्धा स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील प्रवाशांनी केली असेल. प्रवाशांच्या मते, मुंबई ते नागपूर दरम्यान धावणाऱ्यां जवळपास सर्वच एक्सप्रेसला बडनेरा या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

हे पण वाचा :- मुंबईला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ प्रवाशांना आता सीएसएमटीला जाता येणार नाही, दादरलाच उतरावे लागणार, कारण कि…..

शिवाय अमरावतीला मुंबईला प्रवास करण्यासाठी एक स्पेशल एक्सप्रेस ट्रेन देखील आहे. मुंबई-अमरावती मेल-एक्सप्रेसचा अमरावती जिल्ह्यातील प्रवाशांना फायदा होत आहे. मात्र गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यातून थेट मुंबईला प्रवास करण्यासाठी अद्याप एकही एक्सप्रेस ट्रेन सुरू नाही.

या प्रवाशांना वर्धा किंवा नागपूरला जाऊन मुंबईसाठी ट्रेन पकडावी लागते. पण जर दुरांतो एक्सप्रेसने प्रवास करायचा असला तर केवळ नागपूरचाच पर्याय आहे. कारण की, दुरांतो एक्सप्रेसला वर्धा या रेल्वे स्थानकावर थांबा नाही. यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील तसेच वर्धा जिल्ह्यातील प्रवाशांनी आता वर्धा रेल्वे स्थानकावर दुरांतो एक्सप्रेसला थांबा द्यावा अशी मागणी केली आहे.

प्रवाशांनी आता दुरांतो एक्सप्रेसला बडनेरा येथे देण्यात आलेल्या थांबा रद्द करून वर्धा येथे द्यावा अशी मागणी केली आहे. निश्चितच प्रवाशांची ही मागणी मध्य रेल्वे मान्य करते का? याकडे आता विशेष लक्ष राहणार आहे.

हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला ‘या’ गावात थांबा मिळणार? पहा काय म्हणाले रेल्वे अधिकारी

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा