Turmeric Variety : भारतात खरीप हंगामामध्ये सोयाबीन कापूस तूर कांदा मका बाजरी ज्वारी अशा इत्यादी महत्त्वाच्या पिकांची शेती केली जाते. याव्यतिरिक्त मसाला वर्गीय पिकांमध्ये हळदीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होते.
हळद हे एक प्रमुख मसाला वर्गीय पीक आहे शिवाय याला कॅश क्रॉप म्हणजेच नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या नगदी पिकाची लागवड संपूर्ण भारत वर्षात कमी अधिक प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यातही हळदीची लागवड विशेष उल्लेखनीय आहे.
राज्यात हळद लागवड प्रामुख्याने सांगली जिल्हा व आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळते. राज्यातील इतरही भागात कमी अधिक प्रमाणात काही प्रयोगशील शेतकरी बांधव या पिकाची लागवड करून चांगले उत्पादन मिळवत आहेत.
हे पण वाचा :- ‘अस’ झालं तरच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ! कापसाच्या दरात होणार विक्रमी वाढ, वाचा…
एका आकडेवारीनुसार आपल्या राज्यात जवळपास आठ हजार पाचशे हेक्टर जमिनीवर याची शेती केली जाते. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हळदीची लागवड ही 15 मे ते 30 जून या काळात केली जाते. या कालावधीमध्ये हळदीची लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.
दरम्यान यावर्षी हळद पिकाच्या लागवडी खालील क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात वाढ होईल असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला आहे. सोबतच तज्ञ लोकांनी हळदीच्या सुधारित वाणाची लागवड करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. अशा परिस्थितीत आज आपण हळदीच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा अगदी थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- 800 रुपयाची बियाण्याची बॅग 1600 ला ; तरीही कपाशीच्या ‘या’ वाणालाच शेतकऱ्यांची पसंती; या वाणाच्या विशेषता तरी काय?
हळदीच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
पितांबर :- हळदीचा हा एक सुधारित वाण आहे. केंद्रीय औषधी आणि सुगंधी संशोधन संस्था या राष्ट्रीय संस्थेने हळदीची ही जात विकसित केली आहे. या वाणापासून हेक्टरी 65 टन एवढे हळद कंदाचे उत्पादन मिळते असा दावा केला जातो. साहजिकच या जातीची लागवड हळद उत्पादकांसाठी फायदेशीर ठरणार यात शंकाच नाही.
सुंगधम :- हळदीचा हा आणखी एक सुधारित वाण. या जातीचे हळद कंद हे किंचित लालसर रंगाचे असतात. या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा साधारणता 210 दिवसांचा अर्थातच सात महिन्यांचा असतो. या जातीपासून 80 ते 90 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळते असा दावा केला जातो.
हे पण वाचा :- निंबोळी अर्क ‘या’ पिकासाठी ठरणार वरदान ! जैविक किड नियंत्रणात करणार मोठी मदत
सुरमा :- हळदीची ही देखील एक सुधारित जात असून हळद उत्पादकांमध्ये ही जात विशेष लोकप्रिय आहे. ही जात पेरणी केल्यानंतर अर्थातच लागवड केल्यानंतर सुमारे सात महिन्यांनी परिपक्व बनते. म्हणजेच पेरणीनंतर 210 दिवसात या पासून शेतकऱ्यांना उत्पादन मिळू शकते. या जातीपासून एकरी 80 ते 90 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.
सुदर्शन :- नावाप्रमाणेच या जातीचे हळदीचे कंद हे दिसण्यास खूपच सुरेख असतात. आकाराने लहान असतात. शिवाय ही जात वर नमूद केलेल्या जातींपेक्षा लवकर परिपक्व होते. साधारणता 190 दिवसात म्हणजेच सहा महिने आणि दहा दिवसांच्या कालावधीमध्ये ही जात काढण्यासाठी तयार होते. या जातीपासून एकरी 110 ते 115 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अर्थातच उत्पादनाच्या बाबतीत सुदर्शन वाण हा इतर वाणाच्या तुलनेत सरस आहे. साहजिकच या वैशिष्ट्यांमुळे हा वाण हळद उत्पादकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे.
हे पण वाचा :- हळद लागवड करताय का ? मग हळदीच्या सुधारित जाती कोणत्या ? वाचा….