निंबोळी अर्क ‘या’ पिकासाठी ठरणार वरदान ! जैविक किड नियंत्रणात करणार मोठी मदत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nimboli Ark : गेल्या काही वर्षांमध्ये रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर पीक वाढीसाठी आणि पिकावर येणाऱ्या कीड नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच्या वापरामुळे जरी सुरुवातीच्या टप्प्यात पीक उत्पादन वाढीत आणि पीक वाढीत मदत मिळाली असेल तरीदेखील रासायनिक खतांच्या आणि औषधांच्या निर्बंध वापरामुळे आता जमिनीचा पोत ढासळला आहे.

आता या अशा रासायनिक औषधांच्या आणि खतांच्या वापराने पीक उत्पादनात घट येत आहे.परिणामी रासायनिक खताने औषधे वापरण्याऐवजी सेंद्रिय खतांचा आणि औषधांचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे.

किड नियंत्रणासाठी देखील सेंद्रिय औषधे फवारावी तसा सल्ला जाणकार लोकांकडून दिला जात आहे. सेंद्रिय औषधांमध्ये तसेच जैविक किड नियंत्रणामध्ये निंबोळी अर्क एक महत्त्वाचे फॅक्टर आहे.

निंबोळी अर्काच्या वापरामुळे जैविक किड नियंत्रण केले जात असून आज आपण निंबोळी अर्क कोणकोणत्या किडींच्या नियंत्रणासाठी वापरले जाऊ शकते तसेच कोणत्या पिकात वापरले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- हळद लागवड करताय का ? मग हळदीच्या सुधारित जाती कोणत्या ? वाचा….

निंबोळी अर्काचा वापर कोणत्या पिकात आणि कोणत्या कीटकांसाठी होतो

सेंद्रिय शेतीमधील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, निंबोळी अर्काचा वापर विविध पिकांवरील किडीच्या नियंत्रणासाठी केला जाऊ शकतो. यात कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला पिके, फळपिकांवर येणाऱ्या किंडींच्या नियंत्रणासाठी निंबोळीअर्क फवारला जातो.

या पिकांवर निंबोळी अर्काची फवारणी केल्यास विविध कीटकांपासून पीक वाचवण्यास मदत मिळते. असे सांगितले जाते की निंबोळी अर्काची फवारणी केल्यास मावा, फुलकिडे, पांढरी माशी, तुडतूडे, पिठ्या ढेकून या रस शोषक किडीवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते.

तसेच पतंगवर्गीय किडींमध्ये गुलाबी बोंडअळी, घाटेअळी, शेंडे व फळे पोखरणारी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी अशा किडींचे नियंत्रण देखील पिकावर निंबोळी अर्काची फवारणी केल्यास यशस्वीरीत्या केले जाऊ शकते.

हे पण वाचा :- सोयाबीनवर यंदा ‘या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता; आतापासूनच करा ‘हे’ काम, उत्पादनात घट येणार नाही

निंबोळी अर्काच्या वापराचे फायदे

किडनियंत्रणासाठी निंबोळी अर्क फवारल्याने कीटक लगेच मरत नाहीत. मात्र याचा परिणाम कीटकांवर होतो. निंबोळी अर्काची फवारणी केल्यास काही कीटक याच्या वासामुळे दूर पळतात.

काही कीटक निंबोळी अर्कांमुळे पीक खात नाहीत. तर काही कीटक याची फवारणी केल्यास प्रजनन करण्यास अक्षम बनतात. म्हणजे याच्या फवारणीमुळे अनेक कीटक अंडी घालत नाहीत.

यामुळे कीटकांच्या नवीन पैदाशी तयार होत नाहीत. परिणामी कीटकांची सायकल बाधित होते नवीन कीटक तयार होत नाहीत. तर कीटकांच्या अंड्यातून बाहेर येणारे कीटक या निंबोळी अर्कामुळे काही न खाता उपाशी पोटी मरून जातात. 

हे पण वाचा :- अखेर कापूस लागवडीचा श्रीगणेशा झाला; ‘या’ आधुनिक पद्धतीने करा कापसाची लागवड, मजुरीत होणार बचत, उत्पादनात होणार मोठी वाढ

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा