Turmeric Farming : सात जूनला मान्सूनचे भारताच्या मुख्य भूमित आगमन झाले. यानंतर चार दिवसांनी अर्थातच काल 11 जून रोजी राज्यातील दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन झाले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच येत्या काही तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरणार आहे. यामुळे साहजिकच उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. शिवाय शेतकऱ्यांची शेती कामांची लगबग देखील वाढणार आहे. खरीप हंगामाला जोरदार सुरुवात होणार आहे.
मका, सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांची शेतकरी पेरणी करणार आहेत. या पिकांसोबतच विविध नगदी पिकांची देखील शेतकरी बांधव शेती करतात. यात हळदीचा देखील समावेश होतो. हळदीची लागवड भारतातील बहुतांशी राज्यात केली जाते.
हे पण वाचा :- सोयाबीनवर यंदा ‘या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता; आतापासूनच करा ‘हे’ काम, उत्पादनात घट येणार नाही
आपल्या महाराष्ट्रात देखील सांगली जिल्ह्यात व परिसरात मोठ्या प्रमाणात हळद उत्पादन घेतले जाते. हळदीची लागवड ही साधारणतः 15 मे ते 30 जून दरम्यान केली जाते.
या पिकाची लागवड निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते मात्र याच्या सुधारित वाणाची पेरणी करण्याचा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे. दरम्यान आज आपण हळदीच्या सुधारित वाणाची माहिती जाणून घेणार आहोत.
पितांबर :- हळदीची ही एक सुधारित जात म्हणून ओळखली जाते. याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. ही जात केंद्रीय औषधी आणि सुगंधी संशोधन संस्थेने (सीआयएमएपी) विकसित केली आहे. या जातीपासून हेक्टरी ६५ टन हळदीच्या कंदांचे उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जातीचे पिक सुमारे सात ते नऊ महिन्यात परिपक्व होते अशी माहिती जाणकार लोकांनी दिली आहे.
हे पण वाचा :- अखेर कापूस लागवडीचा श्रीगणेशा झाला; ‘या’ आधुनिक पद्धतीने करा कापसाची लागवड, मजुरीत होणार बचत, उत्पादनात होणार मोठी वाढ
सुंगधम :- हळदीची ही देखील एक चांगली जात आहे. शेतकऱ्यांमध्ये हळदीचा हा देखील वाण विशेष लोकप्रिय बनला आहे. या जातीचे कंद आकाराने लांब असतात आणि त्यांचा रंग किंचित लालसर असतो. ही जात 210 दिवसांत परिपक्व होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. साहजिकच पीक कालावधी हा पितांबर जातीपेक्षा कमी आहे. तसेच या जातीपासून शेतकऱ्यांना 80 ते 90 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सोरमा :- भारतातील ज्या राज्यात हळदीचे उत्पादन घेतल्या जाते त्या राज्यामध्ये ही जात विशेष लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात मात्र या जातीची लागवड फारशी केली जात नसल्याचे सांगितले जाते. या जातीच्या हळदीचे कंद आतून केशरी रंगाचे असतात. या जातीची लागवड केल्यानंतर साधारणतः सात महिन्यांनी पीक परिपक्व बनते. या जातीपासून एकरी 80 ते 85 क्विंटल पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते.
सुदर्शन :- हळदीचे हे देखील एक सुधारित वाण म्हणून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. अनेक हळद उत्पादक या जातीची लागवड करण्यास पसंती दाखवतात. या जातीचे कंद आकाराने लहान असतात. ही जात वर नमुद केलेल्या इतर जातींच्या तुलनेत लवकर तयार होते. या जातीला तयार होण्यासाठी १९० दिवस लागतात. तसेच हळदीच्या या जातीपासून एकरी 110 ते 115 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते असा दावा जाणकार लोकांच्या माध्यमातून केला जातो.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! राज्यातील मान्सून आगमनाबाबत भारतीय हवामान विभागाने दिली ‘ही’ मोठी गुड न्युज, पहा काय म्हणतंय IMD