शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! राज्यातील मान्सून आगमनाबाबत भारतीय हवामान विभागाने दिली ‘ही’ मोठी गुड न्युज, पहा काय म्हणतंय IMD

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात लवकरच मान्सून आगमन होणार आहे. यासंदर्भात भारतीय हवामान विभागाने नुकतीच एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.

आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्र आणि गोव्यात मानसून आगमनासाठी पोषक हवामान तयार होत आहे. अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेकडे सरकले असून कर्नाटकच्या किनारपट्टीवर मान्सूनने चांगली प्रगती केली आहे.

कर्नाटक येथील करवार पर्यंत मान्सून पोहोचला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असून येत्या काही तासात महाराष्ट्राच्या भूमीवर मान्सून पोहोचणार आहे.

उद्या 12 जून रोजी मान्सूनचे राज्यात आगमन होणार असा अंदाज IMD चा आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या उंबरठ्यावर उद्या मान्सून पोहोचणार अशी बातमी असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले आहे. 

हे पण वाचा :- सोयाबीनची ‘या’ पद्धतीने लागवड करा आणि हमखास 15 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवा !

आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, मान्सूनच्या वाऱ्यांसाठी पोषक हवामान तयार झाले असल्याने उद्या 12जुन रविवारी मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा आणखी काही भाग, गोवा आणि महाराष्ट्र, तमिळनाडूच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता दाट आहे.

तर बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह संपूर्ण पूर्वोत्तर राज्य, पश्चिम बंगालचा हिमालयाकडील भाग आणि सिक्कीम राज्यात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यताही भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तविण्यात आली आहे.

एकंदरीत उद्या मान्सून तळ कोकणात येणार असा अंदाज आहे. खरंतर दरवर्षी मान्सूनचे आगमन एक जूनच्या आसपास भारताच्या मुख्य भूमीवर अर्थातच केरळात होत असते. केरळात मान्सून पोहोचला की तेथून आठ दिवसात अर्थातच सात जून ते आठ जून दरम्यान तळ कोकणात मान्सूनचे आगमन होते. 

हे पण वाचा :- अहमदनगर, नाशिक, पूणे, सातारासह ‘त्या’ 24 जिल्ह्यात विजा मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता ! तुमच्या जिल्ह्यात पाऊस होणार की नाही? वाचा….

यंदा मात्र तळ कोकणात आगमनासाठी मान्सूनला तब्बल पाच दिवस उशीर होणार आहे. तसेच केरळमध्ये देखील आठ दिवस उशिराने मान्सून पोहोचला आहे. मान्सून यंदा उशिराने पोहोचला असल्याने सहाजिकच शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.

परंतु उशिरा आगमन झाले तरी चालेल मात्र मान्सून काळात समाधानकारक पाऊस पडावा अशी शेतकऱ्यांची आशा आहे. दरम्यान कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना मान्सून आगमन झाले तरीही पेरणीसाठी घाई करू नये असे आवाहन केले आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाला मगच शेतकऱ्यांनी पीक पेरणीचे नियोजन करावे जेणेकरून त्यांच्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ येणार नाही.

हे पण वाचा :- अखेर शासनाला जाग आली ! ‘या’ शेतकऱ्यांना 46 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर, वाचा…

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा