Thane News : मुंबई तसेच ठाणे शहरात गेल्या काही दशकात लोकसंख्या मोठ्या वेगाने वाढली आहे. यामुळे मुंबई आणि ठाण्यामध्ये खाजगी वाहनांची संख्या झपाट्याने विस्तारली आहे. परिणामी रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत शहरातील ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी प्रस्तविकासाची कामे केली जात आहेत.
दरम्यान आता ठाणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएने एक मोठा प्लॅन आखला आहे. वास्तविक मुंबईकरांना नासिक आणि पुण्याकडे प्रवास करायचा असल्यास ठाणे शहरातून जावे लागते. यामुळे ठाण्यात कायमच वाहतूक कोंडी होत असते. या पार्श्वभूमीवर आता एमएमआरडीएने आनंद नगर ते साकेत दरम्यान उन्नत मार्ग तयार करण्याची घोषणा केली आहे. यासाठी प्राधिकरणाने मान्यता देखील दिली आहे.
हे पण वाचा :- मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा वेग किती? समोर आली धक्कादायक माहिती, पहा….
यामुळे केवळ ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नसून मुंबईकरांना पुणे आणि नाशिक लवकर काढता येणे शक्य होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आनंदनगर ते साकेत दरम्यान उन्नत मार्ग विकसित करण्यासाठी एमएमआरडीएला तब्बल 1275 कोटी रुपये खर्च करावा लागणार असून या खर्चाला नुकतीच प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.
या मार्गामुळे मुंबई शहरातून पुणे आणि नासिक कडे जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे शहरात एन्ट्री करण्याची गरज राहणार नाही. तर हे प्रवासी सरळ या उन्नत मार्गाने शहराबाहेरून पुणे आणि नाशिककडे मार्गक्रमण करू शकणार आहेत. निश्चितच या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी फुटणार असून 25 लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहराला याचा मोठा फायदा होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
कसा राहणार हा उन्नत मार्ग
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, आनंद नगर ते साकेत दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर या उन्नत मार्गाचे निर्माण केले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकल्पासाठी जवळपास १२७५ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान या खर्चास एमएमआरडीएने मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
अर्थातच आता या उन्नत मार्गाच्या विकासासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. हा होऊ घातलेला उन्नत मार्ग 6.3 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. हा उन्नत मार्ग ३ अधिक ३ असा म्हणजे सहा लेनचा राहणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मार्गामुळे ठाणे शहरात वाहतूक कोंडी होणार नाही शिवाय मुंबईकरांचा पुणे आणि नाशिककडील प्रवास जलद होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! आता प्रवास होणार सुपरफास्ट, पण….