मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! आता प्रवास होणार सुपरफास्ट, पण….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Goa Travel News : मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या संथगतीने सुरू असलेल्या कामावर माननीय न्यायालयाने देखील ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान आता मुंबई किंवा महामार्गावरील परशुराम घाटात युद्धपातळीवर काम सुरू झाले असून आता काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र घाटातील डेंजर झोनमधील काम करण्यासाठी हा घाट काही दिवस बंद ठेवला जाणार आहे.

25 एप्रिल 2023 म्हणजेच येत्या मंगळवारपासून ते 10 मे 2023 पर्यंत हा घाट बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये दुपारी 12 ते सायंकाळी पाच या वेळेत हा घाट बंद करण्याचा निर्णय झाला आहे. डेंजर झोन मधील काम करताना प्रवाशांच्या जीवाला काही धोका पोहोचू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ शहरापर्यंत धावणार ! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मान्यता मिळाली

घाटातील वाहतूक बंद राहिल्यास घाटातील काम युद्धपातळीवर करता येणार असल्याने हा निर्णय झाला आहे. जिल्हाधिकारी महोदय यांच्या माध्यमातून या संदर्भात सविस्तर अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली आहे. 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की 5.40 किलोमीटर लांबीच्या या परशुराम घाटातील बहुतांशी काँक्रिटीकरणाचे कामे झाली आहेत. मात्र घाटातील 1.20 किलोमीटरचे अंतर हे डेंजर झोन मधील आहे. यामुळे हे डेंजर झोनमधील काम करण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. याच पार्श्वभूमीवर ही वाहतूक बंद करण्यात आली आहे.

निश्चितच परशुराम घाट पंचवीस एप्रिल पासून पुढील दहा दिवस बंद राहणार असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही काळ अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

मात्र या परशुराम घाटातील काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर वाहने सुसाट धावणार आहेत. यामुळे मुंबई गोवा प्रवास आणखीन सोयीचा होणार आहे. घाट बंद झाला की छोटी वाहने चिरणी, आंबडस मार्गे सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे पण वाचा :- मुंबई ते गोवा दरम्यानचा प्रवास होणार सुसाट; ‘हा’ अतिमहत्वाचा मार्ग ‘या’ दिवशी होणार खुला, पहा….

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा