Talathi Bharati : राज्यातील लाखो तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी भरतीची तरुणांकडून वाट पाहिली जात आहे. आता तलाठी भरती प्रक्रिया संदर्भात एक मोठी माहिती हाती येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. वास्तविक पाहता तलाठी भरतीसाठी जानेवारीअखेरपर्यंत जाहिरात येण अपेक्षित होतं. मात्र अद्याप तलाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.
त्यामुळे ही जाहिरात नेमकी केव्हा येईल याची उत्सुकता तरुणांना लागून आहे. जाणकार लोकांच्या मते, अंतर्गत व शासकीय कामांमुळे तलाठी भरतीसाठी अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. पण आता ही जाहिरात लवकरच येणार आहे.
एका मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आता तलाठी भरतीची जाहिरात ही मार्च महिन्यात निघणार आहे. मार्च महिन्यात जाहिरात निघाल्यानंतर प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू होईल यानंतर ऑगस्ट महिन्यापर्यंत ही संपूर्ण भरतीची प्रक्रिया आटोपली जाईल.
अशा परिस्थितीत इच्छुक उमेदवारांना आत्तापासून तलाठी भरतीसाठी तयारी करावी लागणार आहे. आता पण कोणत्या विभागात किती तलाठीचे पदे भरली जातील, यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन मान, वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्र संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- तरुणांसाठी खुशखबर ! पुणे महापालिकेत निघणार मोठी भरती; ‘या’ पदाच्या रिक्त जागासाठी होणार भरती, वाचा सविस्तर
कोणत्या विभागात भरली जातील तलाठीची पदे
एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, नाशिक – 803 पदे, औरंगाबाद – 799 पदे, कोकण – 641 पदे, नागपूर – 550 पदे, अमरावती – 124 पदे, पुणे – 702 पदे भरली जाणार आहेत. यामुळे आता प्रत्यक्ष जाहिरात केव्हा प्रसिद्ध होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तलाठी पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
तलाठी पदासाठी अर्ज करणारा इच्छुक उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. तसेच त्याने मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. सोबतच संगणकाच बेसिक ज्ञान असणं आवश्यक राहील, यासाठी एमएससी-आयटी चा कोर्स केलेलं बंधनकारक असेल. याशिवाय इच्छुक उमेदवाराला हिंदी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे देखील अनिवार्य राहणार आहे.
तलाठी पदासाठी वेतन मान आणि वयोमर्यादा
तलाठी पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा 18 ते 35 वर्षे वयोगटातील असावा. मात्र खेळाडूंना पाच वर्षे सुट राहील. तसेच भूकंपग्रस्त, अपंग, व इतर प्रकल्पग्रस्त उमेदवारांना सात वर्षाची सूट राहणार आहे. तलाठी पदासाठी 5200 ते वीस हजार दोनशे दरम्यान वेतन मान राहणार आहे.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! राज्यात ‘या’ तारखेपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरू होणार; महसूलमंत्र्यांची माहिती