Talathi Bharati 2023 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्यासाठी ही एक मोठी गुड न्यूज राहणार आहे. खरं पाहता गेल्या अनेक महिन्यांपासून तलाठी भरतीची वाट पाहिली जात आहे. इच्छुक उमेदवार भरतीसाठी तयारी करत असून शासनाकडून भरती प्रक्रिया केव्हा राबवली जाते याकडे लक्ष लावून आहेत. दरम्यान आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तलाठी भरती प्रक्रिया संदर्भात एक मोठी माहिती सार्वजनिक केली आहे.
महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढल्या महिन्यात तलाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. 15 मार्चपासून राज्यात तलाठी भरती प्रक्रिया 2023 सुरू होणार असून तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या नवयुवकांसाठी ही निश्चितच आनंदाची पर्वणी राहणार आहे. आपणास सांगू इच्छितो की अहमदनगर मधील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषदेमध्ये महसूल मंत्री विखे पाटील यांनी हजेरी लावली होती.
या महसूल परिषदेत राज्याचे दस्तूर खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी देखील हजेरी लावली होती. या महसूल परिषदेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून या निर्णयाला लवकरच कॅबिनेटच्या बैठकीत मांडले जाणार असून हे निर्णय शासन निर्णयाच्या माध्यमातून लागू केले जाणार आहेत. या परिषदेत वाळू लिलावाच्या संदर्भात मोठा निर्णय शासनाने घेतला आहे.
वाळू लिलावाच्या महत्त्वाच्या धोरणाचा अंतिम मसुदा या परिषदेत तयार झाला असून लवकरच याला कॅबिनेटमध्ये ठेवलं जाणार आहे. याबाबतीत महसूलमंत्र्यांनी वाळूची लिलाव पद्धत बंद होईल असे संकेत दिले आहेत. यामुळे वाळू संदर्भात कोणतं धोरण शासनाकडून आखण्यात आल आहे याकडे विशेष लक्ष राहणार आहे. दरम्यान या महसूल परिषदेत जे काही निर्णय झाले आहेत ते निर्णय येथे सात ते आठ दिवसात कॅबिनेटमध्ये मांडले जातील आणि तेव्हाच या निर्णयाबाबत सुस्पष्टता येईल.