Surat Chennai Greenfield Expressway : सुरत चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. सध्या या महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात भूसंपादनाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र या महामार्गामध्ये बाधित शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या मोबदल्यात फारच तुटपुंजी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
त्यामुळे आपल्याला वाढीव मोबदला मिळावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महामार्गामध्ये बाधित शेतकऱ्यांनी संघर्ष सुरु केला आहे. आता जिल्ह्यातील शेतकरी बांधव या मुद्द्यावर आक्रमक बनले आहेत. महामार्गामध्ये जाणाऱ्या जमिनीला वाढीव मोबदला दिला नाही तर महामार्गाचे काम थांबवू असा इशारा शेतकऱ्यांच्या माध्यमातून दिला जात आहे.
हे पण वाचा :- शेवटी निर्णय झालाच ! ‘या’ महिन्यात येणार पीएम किसानचा चौदावा हप्ता, तारीख डिक्लेर झाली? पहा….
दरम्यान या महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा, त्यांच्या सोन्यासारख्या जमिनीचा योग्य मोबदला त्यांना मिळावा यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. अशातच आता समितीच्या अध्यक्षांनी आपल्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली आहे.
या भेटीदरम्यान महामार्गामध्ये बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा या संदर्भात चर्चा झाली असून या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी बैठक लावावी अशी मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी केली आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत महत्वाची बातमी; ट्रेनच्या वेळेत होणार मोठा बदल, रेल्वे मंत्री म्हटले की…..
विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या या मागणीवर शिंदे आणि फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली आहे. तसेच तिथे उपस्थित असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर या संदर्भात बैठक लावण्यासाठी निर्देश दिले असल्याचे मोरे यांनी यावेळी सांगितले.
यामुळे आता लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय बैठक घेतील आणि या महामार्गामध्ये बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देणे संदर्भात सकारात्मक निर्णय घेतील असा आशावाद व्यक्त होत आहे. निश्चितच, जर या होऊ घातलेल्या बैठकीत सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गामध्ये बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचा निर्णय झाला तर बाधित शेतकऱ्यांना यानिमित्ताने न्याय मिळेल एवढं नक्की.
हे पण वाचा :- नागपूरवासियांसाठी आनंदाची बातमी ! नागपूर ते ‘या’ शहरादरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस; असा राहणार रूट, पहा….