Nagpur Vande Bharat Express : नागपूरवासियांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नागपूरला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. खरं पाहता, सध्या महाराष्ट्रसह संपूर्ण देशभर वंदे भारत एक्सप्रेसची मोठी चर्चा आहे. 2019 मध्ये सुरू झालेली ही ट्रेन खूपच कमी वेळात लोकांच्या पसंतीस खरी ठरली आहे.
हेच कारण आहेत केंद्र शासन भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशातील सर्व प्रमुख मार्गावर ही ट्रेन सुरू करत आहे. तसेच प्रवाशांची मागणी पाहता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या शहरात ही ट्रेन सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
हे पण वाचा : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; आता मुंबई ते कल्याण डोंबिवलीचा प्रवास होणार सुसाट, ‘हा’ मार्ग लवकरच होणार सुरु, पहा…..
महाराष्ट्रातील काही मंत्री महोदय देखील आपल्या राज्यात अधिका-अधिक मार्गावर ही ट्रेन सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. आतापर्यंत देशात एकूण पंधरा वंदे भारत एक्सप्रेस सुरु असून यापैकी चार वंदे भारत आपल्या महाराष्ट्राला लाभल्या आहेत.
नागपूर-बिलासपुर, मुंबई-गांधीनगर, मुंबई साईनगर-शिर्डी आणि मुंबई सोलापूर या चार वंदे भारत एक्सप्रेस सध्या राज्यातुन धावत आहेत. अशातच आता नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे राज्याची उपराजधानी, हिवाळी अधिवेशनचे मानकरी नागपूरला आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेसची भेट मोदी सरकारकडून मिळणार आहे.
यामुळे निश्चितच विदर्भातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. नागपूर विदर्भातील एक महत्त्वाच शहर, महाराष्ट्राची उपराजधानी, तसेच विदर्भवासियांसाठी हे शहर खूपच महत्वाचं आहे. विशेष बाब अशी की नागपूरला राजकारणाच्या दृष्टिकोनातून देखील खूप अधिक महत्त्व प्राप्त आहे.
हेच कारण आहे की राज्याची उपराजधानी नागपूरला नुकतेच समृद्धी महामार्गाने राजधानी मुंबईशी कनेक्ट करण्यात आले आहे. शिवाय नागपूरचा विकास म्हणजेच संपूर्ण विदर्भाचा विकास हे समीकरण आहे. यामुळे आता नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान सुपरफास्ट ट्रेन सुरू केली जाणार आहे. शहरात धावणारी ही दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस राहणार आहे. दरम्यान मीडियामध्ये सुरू असलेल्या या चर्चेला रेल्वे अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
काही वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टला दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेली नवीन ट्रेन नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान धावणार आहे. निश्चितच या ट्रेनमुळे दोन शहरांमध्ये जलद कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
ही गाडी नागपूर आणि सिकंदराबाद दरम्यान जलद कनेक्टिव्हिटी तर प्रदान करणारच आहे शिवाय याचा विदर्भातील काही भागांनाही फायदा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या ट्रेनसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.
मुनगंटीवार यांनी वैष्णव यांना पत्र लिहून नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली होती. आता मुनगंटीवार यांचा हा पाठपुरावा यशस्वी झाला आहे. या ट्रेनच्या वेळेबाबत आणि नेमकी ती केव्हा सुरू होईल याबाबत अद्याप रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोणताच उलगडा करण्यात आलेला नाही.
परंतु 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशात एकूण 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत त्यामुळे यादेखील ट्रेनचा नंबर ऑगस्टपर्यंत लागू शकतो असा आशावाद तज्ञ लोकांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.