Staff Selection Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. संपूर्ण भारत वर्षात सर्वात जास्त सरकारी नोकरी उपलब्ध करून देणारा आयोग अर्थातच स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून तब्बल 5,369 जागांसाठी ची मेगा भरती काढण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील नुकतीच प्रकाशित झाली असून इच्छुक उमेदवारांना ही एक मोठी संधी चालून आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, स्टाफ सिलेक्शन कमिशनने एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 11 च्या माध्यमातून तब्बल 5369 रिक्त पदांची भरती सुरू केली आहे. या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांसाठी दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात काही महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा तपशीलवार प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- अखेर निर्णय झालाच ! ‘या’ दोन शहरादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच ‘इतकं’ राहणार तिकीट, पहा डिटेल्स…..
कोणत्या पदांसाठी आयोजित झाली आहे भरती
खरं पाहता, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र महाराष्ट्रातील उमेदवार या पदभरतीसाठी खूपच कमी प्रमाणात तयारी करतात. यामुळे केंद्रीय सरकारी नोकऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचे प्रमाण खूपच कमी आहे. दरम्यान आता एसएससी च्या माध्यमातून सीनिअर टेक्निकल असिस्टंट, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर, चार्जमन, लायब्ररी अँड इन्फर्मेशन असिस्टंट, फर्टिलाइजर इन्स्पेक्टर, कँटीन अटेंडंट, हिंदी टायपिस्ट, इन्वेस्टिगेटर ग्रेड -II, लायब्ररी अटेंडंट, सीनिअर सायंटिफिक असिस्टंट या एकूण दहा पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज कुठे सादर करायचा आणि अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की एस एस सी च्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 27 मार्च 2023 आहे यामुळे इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करावा लागणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! त्या सात मेट्रो मार्गीकेसाठी 166 कोटींचे बिनव्याजी कर्ज, मेट्रोच्या कामाला मिळणार गती
वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता
वर नमूद करण्यात आलेल्या पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा राहणार आहे. 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार वर नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी पात्र राहणार आहे. विशेष म्हणजे ओबीसी एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट देखील राहणार आहे. यासाठी सर्वप्रथम अधिसूचना पाहणे गरजेचे राहणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या या पदांसाठी दहावी बारावी आणि पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहे. मात्र मान्यता प्राप्त बोर्डातून शिक्षण घेतलेले असणे अनिवार्य राहणार आहे.
निवड कशी होईल?
ऑनलाइन परीक्षा आणि कौशल्य चाचणीनंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही ऑनलाईन परीक्षा जून ते जुलैदरम्यान होऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग! पुणे रिंगरोडबाबत महत्वाची बातमी; ‘या’ एका कारणामुळे आता भू-संपादन रखडणार