Vande Bharat Train Ticket 2023 : सध्या देशभरात वंदे भारत ट्रेनच्या मोठ्या चर्चा रंगात आहेत. जलद आणि आरामदायी प्रवासामुळे ही ट्रेन रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. निश्चितच या ट्रेनचे भाडे इतर ट्रेनच्या तुलनेत अधिक आहे तरीदेखील या ट्रेनला प्रवाशांनी पसंती दिली आहे. इतर एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत या गाडीमध्ये असणाऱ्या सोयी सुविधा आणि जलद प्रवास यामुळे ही गाडी कमी कालावधीत लोकप्रिय बनली असून यामुळे भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलत असल्याचे मत व्यक्त होऊ लागलं आहे.
सध्या स्थितीला देशभरात एकूण दहा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रात एकूण चार वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. मुंबई-गांधीनगर, नागपूर-बिलास्पुर, मुंबई-साईनगर शिर्डी आणि मुंबई सोलापूर या चार रूटवर या गाड्या धावत आहेत. आगामी काही दिवसात राज्यातील इतरही काही रूटवर ही ट्रेन सुरू करण्याचा मानस रेल्वे बोर्डाचा आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! त्या सात मेट्रो मार्गीकेसाठी 166 कोटींचे बिनव्याजी कर्ज, मेट्रोच्या कामाला मिळणार गती
या पार्श्वभूमीवर सध्या तयारी केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई ते गोवा दरम्यान ही गाडी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच पुणे सिकंदराबाद या रूट वर धावणारी शताब्दी एक्सप्रेस बंद करून त्याऐवजी वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे. या दोन रूटवर सुरू होणाऱ्या वंदे भारत मात्र केव्हा सुरू होतील याबाबत अद्याप हाती माहिती आलेली नाही.
परंतु आता देशात नवीन दोन वंदे भारत ट्रेन सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाले आहे. यापैकी अकरावी वंदे भारत गाडी ही जयपूर आणि दिल्ली दरम्यान धावणारी राहणार आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, या रूट वर धावणारी वंदे भारत गाडी ही एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग! पुणे रिंगरोडबाबत महत्वाची बातमी; ‘या’ एका कारणामुळे आता भू-संपादन रखडणार
विशेष म्हणजे आता या वंदे भारत गाडीमध्ये किती तिकीट आकारल जाऊ शकत याबाबत देखील माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली ते राजस्थानची राजधानी जयपूर या दरम्यान सुरू होणारी वंदे भारत ट्रेन शताब्दी एक्स्प्रेसच्या वेगाने धावेल. म्हणजे 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने वंदे भारत गाडी धावणार आहे. पण भाडे शताब्दी एक्सप्रेस च्या तुलनेत अधिक राहणार आहे.
शताब्दी एक्सप्रेस पेक्षा या रूटवर वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 30 टक्के अधिकच भाडं द्यावं लागणार आहे. जयपूर ते दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसचे सामान्य कोचचे भाडे सुमारे 1,500 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह कोचचे भाडे सुमारे 1,900 रुपये राहणार आहे. यामध्ये केटरिंग चा समावेश राहणार नाही. म्हणजे आरक्षण, खानपान आणि जीएसटी शुल्क स्वतंत्रपणे जोडले जाणार आहेत.
हे पण वाचा :- म्हाडा कोकण मंडळ सोडतबाबत महत्वाची बातमी; समोर आली ‘ही’ मोठी आकडेवारी, पहा….