St Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या तरुणांना एसटी महामंडळात काम करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही तर सोने पे सुहागा अशी बातमी आहे. एस टी महामंडळ अंतर्गत वर्धा आगारात शिकाऊ उमेदवारांच्या विविध पदाच्या रिक्त 93 जागा भरल्या जाणार आहेत. या पदभरतीची अधिसूचना किंवा जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांना लवकरात लवकर यासाठी अर्ज करण्याच्या आवाहन केले जात आहे.
या भरतीच्या माध्यमातून मोटर मेकॅनिक व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग, वेल्डर, मोटरव्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटर वर्कल, पेंटर, सुतार) या शिकाऊ उमेदवार पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी मात्र इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत. दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात सर्व महत्त्वाची माहिती तपशीलवार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पदानुसार रिक्त जागांचा तपशील खालील प्रमाणे
मेकॅनिक या पदाच्या 60 जागा भरल्या जाणार आहेत.
वेल्डर या पदाच्या 03 जागा या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.
शीट मेटल वर्कर याच्या 12 जागा वर्धा आगारात भरल्या जाणार आहेत.
टर्नर या पदाच्या 02 जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जातील.
इलेक्ट्रीशियन या पदाच्या 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पेंटर या पदाच्या 07 जागा भरल्या जाणार आहेत.
रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग याची एक जागा भरली जाणार आहे.
सुतार या पदाची 01 जागा या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
वर नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. सोबतच या पदांसाठी अर्ज करणाऱ्यां उमेदवाराने संबंधित आयटीआयचा कोर्स केलेला असणे ही आवश्यक आहे. यासंबंधीच तत्सम मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र देखील आवश्यक राहणार आहे. या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार 18 ते 33 वर्षे वयोगटातील असणे मात्र आवश्यक आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण
नोकरी ही वर्धा येथील एसटी महामंडळाच्या आकारात करावी लागणार आहे.
हे पण वाचा :- अखेर निर्णय झालाच ! ‘या’ दोन शहरादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच ‘इतकं’ राहणार तिकीट, पहा डिटेल्स…..
अर्ज करण्याची पद्धत
या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे मात्र अर्ज सादर हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. म्हणजेच या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर संबंधित अर्जाची प्रत ऑफलाइन पद्धतीने सक्षम अधिकाऱ्याकडे सुपूर्द करायची आहे.
अर्ज कुठे सादर करायचा
विभागीय कार्यालय, विभा. लेखा अधिकारी, रा.प. वर्धा या ठिकाणी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
अर्ज हा 6 एप्रिल 2023 पर्यंत वर नमूद करण्यात आलेल्या पत्त्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना पाठवायचा आहे. उशिरा पाठवण्यात आलेले अर्ज कोणत्याही सबबीवर स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद उमेदवाराने घ्यायची आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! त्या सात मेट्रो मार्गीकेसाठी 166 कोटींचे बिनव्याजी कर्ज, मेट्रोच्या कामाला मिळणार गती