RBI Recruitment 2023 : दहावी पास तरुणांसाठी आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदवार्ता समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की आपण रोजच नवनवीन सरकारी नोकरीची माहिती घेऊन हजर होत असतो. दरम्यान, आज आपण आरबीआय मध्ये सुरू असलेल्या एका भरतीची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून एक पदभरती आयोजित झाली आहे.
या माध्यमातून दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. RBI कडून ड्रायव्हर या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या भरती संदर्भात सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा तपशीलवार प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! कोस्टल रोड ‘या’ महिन्यात सुरू होणार; महापालिका आयुक्तांनी थेट तारीखच सांगितली
किती रिक्त पदांसाठी आहे भरती?
RBI च्या माध्यमातून ड्रायव्हर या पदाच्या एकूण पाच रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता अन वयोमर्यादा ?
या पदासाठी सामान्य प्रवर्गातील 28 ते 35 वयोगटातील उमेदवार पात्र राहणार असून इतर मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची अतिरिक्त सूट राहणार आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर या पदासाठी 10 वी पास तसेच हलके वाहन चालक (LMV) परवाना असलेला पात्र राहणार असून चालक पदासाठी मात्र दहा वर्षाचा अनुभव बंधनकारक आहे.
हे पण वाचा :- अखेर निर्णय झालाच! 1 एप्रिलला ‘या’ दोन शहरादरम्यान सूरू होणार 11वी वंदे भारत ट्रेन; पहा संपूर्ण रूटमॅप
अर्ज कसा करावा लागणार
या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी मात्र अधिसूचना एकदा काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे. https://drive.google.com/file/d/1StJv8_D-Plr1Tz-ClgSJ38S90jFn-Mqk/view या लिंक वर क्लिक करून आपण अधिसूचना वाचू शकणार आहात. तसेच याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी आपण https://www.rbi.org.in/ आरबीआयच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
अर्ज करण्याची मुदत
या पदासाठी 27 मार्च 2023 पासून अर्ज स्वीकृती सुरू झाली असून 16 एप्रिल 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत.
नोकरी करण्याचे ठिकाण
आरबीआयच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या ड्रायव्हर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.
हे पण वाचा :- धक्कादायक! ‘या’ शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कांदा विकला असेल तरी अनुदान मिळणार नाही, तुम्ही तर नाहीत ना यादीत