Pune Weather Update : राज्यात सध्या कोकण मध्ये महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा म्हणजे जवळपास सर्वत्र पाऊस पडत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात पावसाचे वातावरण आहे. राज्यात प्रामुख्याने पुणे अहमदनगर बीड सातारा सांगली नाशिक या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. नाशिक जिल्ह्यात तर काल-परवा जवळपास 60 गावात गारपीट झाल्याची नोंद झाली आहे.
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जनता अक्षरशः परेशान झाली आहे. यासोबतच अहमदनगर, पुणे तसेच सातारा जिल्ह्यातील बहुतांशी भागात गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे. या निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होत असल्याचे चित्र आहे. अशातच पुणे वेधशाळेने एक मोठा अंदाज वर्तवला आहे. पुणे वेधशाळेचा हा अंदाज मात्र पुणेकरांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे.
पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या आपल्या नवीन अंदाजानुसार पुणे शहरासह जिल्ह्यात आगामी तीन दिवस पाऊस पडणार आहे. यामुळे पुणेकरांना विशेष सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. वास्तविक आतापर्यंत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचे तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अशातच आणखी तीन दिवस पुणे जिल्ह्यात पावसाची शक्यता वेधशाळेच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना याचा फटका बसू शकतो अशी शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरात तुफान वादळी पाऊस आणि गारपीट झाली आहे.
हे पण वाचा :- आता मध्य महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट ! राजधानी मुंबईशी वाढणार कनेक्ट, पहा….
भीमाशंकर परिसरातील अनेक गावे वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे प्रभावित झाली आहे. अशा परिस्थितीत या परिसरातील मुख्य पीक म्हणजेच आंबा यामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाले असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका यामुळे बसला आहे. पुणे तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील पाच दिवस पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता राहणार आहे. साहजिकच या संबंधित विभागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना यामुळे अधिक सजग आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.