मोठी बातमी ! डिसेंबर 2023 पर्यंत ‘ही’ नवीन वंदे भारत गाडी धावणार, मुंबईसारख्या शहरांना होणार फायदा; रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Vande Bharat Express : भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता, भारतीय रेल्वे वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. भारतीय रेल्वे आता स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेस तसेच वंदे मेट्रो सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

दरम्यान आता याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी माहिती दिली आहे. मंत्री महोदय यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, देशात आता लवकरच वंदे मेट्रो सुरु होणार आहे. ही वंदे मेट्रो मात्र वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा वेगळी राहणार आहे.

हे पण वाचा :- आता मध्य महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट ! राजधानी मुंबईशी वाढणार कनेक्ट, पहा….

अर्थातच वंदे मेट्रो गाडीची रचना ही वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा भिन्न राहील अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तसेच ही वंदे मेट्रो ज्या शहरांमधील अंतर 100 किलोमीटर पेक्षा कमी आहे अशा शहरादरम्यान धावणार आहे. विशेष म्हणजे ही वंदे मेट्रो ट्रेन यावर्षीच सुरू होईल असे देखील वैष्णव यांनी यावेळी सांगितले.

डिसेंबर 2023 पर्यंत ही वंदे मेट्रो गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असे यावेळी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे. ही वंदे मेट्रो ट्रेन मुंबई, कोलकत्ता, दिल्ली यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना त्यांच्या जवळच्या म्हणजे शंभर किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर वसलेल्या शहरांना जोडण्याचे काम करणार आहे.

हे पण वाचा :- काय सांगता ! ‘या’ शेतकऱ्यांनी शासनाच्या ‘त्या’ महत्त्वाच्या योजनेचा लाभ घेतला म्हणून थेट शेतकऱ्यांच्या सातबारावर चढवला बोजा, पहा…..

निश्चितच ज्या पद्धतीने वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी पसंती दर्शवली आहे, तशीच पसंती वंदे मेट्रोला देखील मिळेल अशी आशा भारतीय रेल्वेला आहे. या अनुषंगाने रेल्वेच्या माध्यमातून ही वंदे मेट्रो गाडी लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जाणकार लोकांनी देखील वंदे मेट्रो ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस सारखीच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरेल असं मत व्यक्त केल आहे. यामुळे आता ही गाडी नेमकी केव्हा सुरू होते आणि कोण-कोणत्या शहरादरम्यान या गाडीला सुरू केले जाते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. 

हे पण वाचा :- भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय ! एप्रिलमध्ये आणखी एक वंदे भारत सुरु होणार; कसा असेल रूट, कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार?, पहा……

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा