Pune Vande Bharat Railway News : गेल्या महिन्यात पुणे आणि सोलापूर वासियांना केंद्राकडून एक मोठी भेट मिळाली. ती भेट म्हणजे मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस. या एक्सप्रेसचा सोलापूर वासियांना जेवढा फायदा लागला आहे तेवढ्याच फायदा पुणेकरांना देखील मिळत आहे. यामुळे पुणे आणि सोलापूर वासियांमध्ये या गाडीने समाधान पाहायला मिळत आहे. या ट्रेनमुळे तिन्ही शहरांदरम्यानचा प्रवास अधिक गतिमान आणि आरामदायी झाला आहे.
यासाठी अधिकचा पैसा खर्च करावा लागत आहे मात्र पैसा गेला पण नाद केला या उक्तीप्रमाणे या रूट वरील ट्रेनला सर्वाधिक पसंती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता या ट्रेन बाबत मोठा निर्णय होणार आहे. हा निर्णय पुणेकरांना आणि सोलापूरवासियांना दिलासा देणारा ठरू शकतो असा दावा देखील केला जात आहे. दरम्यान नेमका या ट्रेन बाबत कोणता निर्णय घेतला जाणार आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- नुसताच बोभाटा ! वंदे भारत एक्सप्रेस बाबत समोर आली ‘ही’ मोठी माहिती; टाटाने दिल स्पष्टीकरण
खरं पाहता मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ही सोलापूरहुन मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक सोयीची आहे. मात्र मुंबईहून सोलापूरला प्रवास करताना यात्रे यांची जी वेळ आहे ती वेळ प्रवाशांची गैरसोय करते. त्यामुळे या ट्रेनच्या मुंबईकडील सोलापूरकडे येणाऱ्या वेळेत बदल करण्याची मागणी स्थानिक प्रवाशांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींकडे केली जात आहे.
तसेच लोकप्रतिनिधींनी देखील या मागणीची गांभीर्याने दखल घेतली असून याचा पाठपुरावा सुरू झाला आहे. नुकतेच सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांनी या ट्रेनच्या वेळेत बदल करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली आहे.
हे पण वाचा :- केंद्रे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; जगातील ‘या’ सर्वाधिक उंचीच्या पुलावर धावणार आता वंदे भारत एक्सप्रेस
या भेटीत त्यांनी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या मुंबईहून सुटणाऱ्या वेळेत बदल करण्याची मागणी अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. दरम्यान वैष्णव यांनी या मागणीवर सकारात्मकता दाखवली असून रेल्वे प्रशासन देखील यासाठी सकारात्मक असल्याचे काही मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. यामुळे मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या सायंकाळच्या वेळेत म्हणजेच मुंबईहून सुटणाऱ्या वेळेत बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या असा आहे वेळ?
सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर ही वंदे भारत ट्रेन मुंबईहून दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी सुटते त्यानंतर ही ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावर सात वाजून दहा मिनिटांनी पोहोचते. या रेल्वे स्टेशनवर पाच मिनिटं ही ट्रेन थांबते. मग येथून ही गाडी सोलापूरकडे निघते आणि रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी पोहचते.
हे पण वाचा :- पुणे-सिकंदराबाद दरम्यान आता शताब्दी ऐवजी वंदे भारत एक्सप्रेस धावणार? समोर आली तिकीट दराबाबत मोठी माहिती, पहा…..
वेळेत कसा होणार बदल?
खरं पाहता, सध्या स्थितीला मुंबईहून दुपारी चारला ही ट्रेन निघते यामुळे सोलापूरहून तसेच पुण्याहून मुंबईला कामानिमित्त गेलेल्या प्रवाशांना आपली कामे पूर्ण करून या ट्रेनचा प्रवास करता येणे अशक्य आहे. कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना परिणामी आपले कामे करून सिद्धेश्वर एक्सप्रेस ने प्रवास करावा लागत आहे. यामुळे या ट्रेनचा बहुतांशी प्रवाशांना फायदा होत नसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान याच्या वेळेत जर बदल केला तर प्रवाशांचाही फायदा होईल आणि रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडेल असा दावा केला जात आहे. सोलापूरच्या खासदारांनी देखील हीच मागणी केली आहे. खासदार महोदय यांनी या ट्रेनच्या वेळेत बदल करून ही ट्रेन उशिरा म्हणजेच मुंबईहून सहा वाजता सोडावी अशी विनंती मंत्री महोदयाकडे यावेळी केली आहे. दरम्यान खासदार महोदय यांचा हा पाठपुरावा यशस्वी होण्याचे संकेत आहेत.
मात्र ही ही ट्रेन सहा ऐवजी सायंकाळी सात वाजता मुंबईहून सोलापूर कडे सोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मागणीबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री सकारात्मक असल्याने एप्रिल किंवा मे महिन्यात याबाबत सविस्तर अशी नोटिफिकेशन काढली जाईल आणि हे नवीन वेळापत्रक लागू केलं जाईल असं सांगितलं जात आहे.
निश्चितच जर वेळेत बदल झाला तर सोलापूर आणि पुणेवासियांना खरंच फायदा होणार आहे. सोलापूर तसेच पुण्याहून जे प्रवासी कामानिमित्त मुंबईला जातात त्यांना आता आपले काम करून वंदे भारत एक्सप्रेसनेच परतीचा प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! कोल्हापूर ते मुंबई दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस? केंद्रीय मंत्री सिंधीया करणार पाठपुरावा