Pune 2nd Vande Bharat Railway : पुणेकरांना गेल्या महिन्यात एक मोठी भेट मिळाली. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे मार्गे धावत असल्याने पुणेकरांना पहिली वंदे भारत एक्सप्रेस यानिमित्ताने भेटली. यामुळे पुणेकरांचा सोलापूर आणि मुंबईचा प्रवास गतिमान झाला. विशेष बाब अशी की, या ट्रेनला पुणेकरांनी भरभरून असा प्रतिसाद दिला आहे.
पुण्याहून मुंबईकडील बुकिंग या मुंबई ते सोलापूर पेक्षा तुलनेने अधिक राहिल्या आहेत. निश्चितच सांस्कृतिक राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी, तसेच राज्याची राजधानी यादरम्यान यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. दरम्यान आता पुणेवासीयांना लवकरच एक मोठं गिफ्ट मिळणार आहे.
खरं पाहता पुणे ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्टमध्ये दिली जात आहे. यासाठी रेल्वे विभागाच्या माध्यमातून तयारी जोरात असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुणे सिकंदराबाद या रूटवरील शताब्दी एक्सप्रेस ऐवजी थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा मानस रेल्वेचा आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! कोल्हापूर ते मुंबई दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस? केंद्रीय मंत्री सिंधीया करणार पाठपुरावा
निश्चितच यामुळे पुणे ते सिकंदराबाद हा प्रवास गतिमान होणार आहे. मात्र यासाठी प्रवाशांना अधिकचे भाडे द्यावे लागणार आहे. विशेष बाब म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसचा स्पीड 180 किलोमीटर प्रतितास असला तरी देखील या रूटवर धावणारी वंदे भारत गाडी ही 110 km प्रति तास या वेगाने धावू शकणार आहे. ट्रॅकवरील अपग्रेडेशनचे काम पाहता या रूट वरील वंदे भारत गाडी 110 किलोमीटर प्रति तास या वेगानेच चालवण्याची शक्यता आहे. देशातील इतर काही रूटवर मात्र वंदे भारत गाडी 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे.
त्यामुळे काही जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसमुळे वेळेत फारशी बचत होणार नाही. अधिका-अधिक 30 मिनिटांचा कालावधी प्रवाशांचा यामुळे वाचेल. परंतु भाडे 50% अधिक राहणार आहे. साहजिकच तिकीट दरात दुपटीने वाढ होणार असल्याने हा प्रवास सर्वसामान्यांना परवडणार का? हाच मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2023 यावर्षी अखेर संपूर्ण देशात एकूण 25 वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत. त्यामध्ये आत्तापर्यंत दहा वंदे भारत एक्सप्रेस संपूर्ण देशभरात सुरू आहेत. यापैकी चार वंदे भारत एक्सप्रेस एकट्या आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहेत. या चार पैकी दोन वंदे भारत गाड्या ह्या राज्यअंतर्गत धावत आहेत.
महाराष्ट्र हे एक मात्र असं राज्य आहे ज्या ठिकाणी राज्यअंतर्गत दोन वंदे भारत एक्सप्रेस कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. अशातच आता पुण्याला दुसरी वंदे भारत मिळणार आहे. दरम्यान ही गाडी केव्हा सुरू होईल याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. वास्तविक ही गाडी फेब्रुवारी महिन्यातच सुरू करण्याचा मानस होता मात्र अद्याप याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून कोणतीच माहिती हाती आलेली नाही.
परंतु या रूटवर वंदे भारत गाडी सुरू झाली तरी देखील शताब्दी एक्सप्रेसचा तुलनेत तिकीट दर दुपटीने अधिक राहणार आहे यामुळे ही गाडी निश्चितच सर्वसामान्यांना परवडेल का? या ट्रेनला खरंच प्रवाशांकडून पसंती मिळेल का हा मोठा प्रश्न या निमित्ताने प्रवाशांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
हे पण वाचा :- सातवी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी! ‘या’ पदासाठी निघाली जाहिरात, पगार मिळणार तब्बल 60 हजार, आजच करा अर्ज