Pune News : राजधानी मुंबई ते सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन्ही शहरांदरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. अशा परिस्थितीत या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागतो. या मार्गावर दिवसेंदिवस ट्रॅफिक ही वाढतच असल्याने वाहतूक कोंडीची समस्या देखील दिवसेंदिवस गहन होत आहे.
अशा परिस्थितीत वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी या मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान मिसिंग लिंकचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान आता या मिसिंग लिंक बाबत मोठी माहिती हाती येत आहे. खरं पाहता या प्रकल्पांतर्गत उभारले जाणारे दोन्ही बोगद्यांचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे.
याशिवाय या प्रकल्पांतर्गत आशिया खंडातील सर्वात मोठा पूल देखील विकसित केला जात आहे. याचे देखील 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. या पुलाचे 2024 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण काम पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! नासिक-पुणे रेल्वेसाठी दिलेली स्थगिती नजरचुक, महारेलचा दावा; आता सुरू होणार का भूसंपादन, वाचा?
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, मिसिंग लिंक प्रकल्पाची लांबी 13.3 किलोमीटर आहे. हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण केल जात आहे. या मिसिंग लिंकमुळे बोर घाटातील सहा किलोमीटरचा जो वळण भाग आहे त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
यामुळे प्रवाशांचा वेळ आणि रिस्क कमी होणार आहे. वास्तविक मुंबई पुणे महामार्गावर अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे. विशेषता घाट सेक्शन मध्ये अनेकदा अपघात होतात. मात्र आता या मिसिंग लिंक प्रोजेक्ट मुळे अपघातांवर नियंत्रण मिळवता येणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांची वेळेचीही बचत होणार आहे.
मुंबई पुणे मिसिंग लींक प्रोजेक्ट विषयी थोडक्यात
या प्रोजेक्ट अंतर्गत केबल ब्रिज विकसित केला जात आहे ज्याची लांबी ६४५ मीटर राहणार आहे आणि उंची १३५ मीटर असेल. विशेष बाब म्हणजे हा केबल ब्रिज आशिया खंडातील सर्वात मोठा दरीवरील पूल असल्याचा एमएसआरडीसीचा दावा आहे. निश्चितच यामुळे या प्रकल्पाची शोभा वाढणार आहे तसेच भारतीय स्थापत्य कलेचा उत्तम नमुना वैश्विक पटलावर पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे. दरम्यान या प्रकल्पांतर्गत जे दोन बोगदे हाती घेण्यात आले होते त्या बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. या दोन बोगद्यांपैकी एक बोगदा 1.6 किलोमीटर तर दुसरा बोगदा नऊ किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्प अंतर्गत खालापूर टोल ते खोपोली एक्झिट पर्यंत आठ पदरी रस्ता तयार होणार आहे.
हे काम सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या मिसिंग लिंक प्रोजेक्टचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे महामार्गाचे अंतर ६ किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे, विशेष बाब म्हणजे हे अंतर बोरघाट सेक्शन मध्ये कमी होणार असल्याने प्रवाशांना प्रवास करताना सुरक्षितता देखील लागणार आहे.
याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रोजेक्ट सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस राज्य रस्ते विकास महामंडळाने आखला आहे. निश्चितच सप्टेंबर 2024 पर्यंत या प्रोजेक्टचे काम पूर्ण झाले तर प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
हे पण वाचा :- SBI मधून होमलोन घेण्याचा विचार करताय का? मग एसबीआय गृहकर्ज संदर्भात ए टू झेड माहिती वाचा एका क्लिकवर